वाडेगांव(डॉ चांद शेख)-वाडेगांव येथील जागृत चौक परिसरात कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढला असून हे रूग्ण खामखेड येथील रुग्णाच्या संपर्कातील असून वाडेगांव व खामखेड या परिसरात आरोग्य विभागा कडून घरोघरी जाऊन तपासनी सुरू आहे. तसेच या परिसरातील रूग्णाच्या घराला सिल करण्यात आले यावेळी आरोग्य विभागाचे पथक, पोलीस पथक, महसुल विभाग, तसेच ग्राम पंचायत चे सरपंच सौ अन्नपुर्णा मानकर .ग्रामविकास अधिकारी डी एस अंभोरे, ग्राम पंचायत कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.
ग्राम पंचायत प्रशासनाकडून हलगर्जीपना
ग्राम पंचायत प्रशासनाच्या कर्मचाऱ्या कडून हँड ग्लोझ सार्वजनीक ठिकानी टाकण्यात आल्याने परिसरातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून संबंधीत विभागाने या कडे लक्ष योग्य कार्यवाही करावी अशी मागनी होत आहे नागरिकांनी केली आहे.