अकोट (देवानंद खिरकर) -शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापण दिनानिमीत्त शिवसेनेच्या वतीने स्थानिक मराठी शाळा क्रमांक १ येथे वृक्षारोपण माजी आमदार संजय गावंडे यांचे हस्ते करण्यात आले. २०% राजकारण आणि ८०% समाजकारण या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या मुलमंत्राच्या आधारे आज अकोट शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचा वर्धापणजिन सोहळा साजरा करण्यात आला.स्थानिक शाळा क्रमांक १ येथे वृक्षारोपण व तद्नंतर नवयुग वाचनालय येथे भारत-चायना सिमेवर देशाचे रक्षण करतांना शहीद झालेल्या विर जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख माननिय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी व्हिडीओ काँन्परंसव्दारे शिवसेनेची पायाभरणी ते मुख्यमंत्री पदाप्रयंतची वाटचाल, शिवसेनेची ध्येय धोरणे समजाऊन सांगीतले. व येणार्या काळात पक्ष व संघटन मजबुतीवर अधीक लक्ष देण्याच्या सुचना शिवसैनिकांना दिल्या.सोबतच पर्यावरण मंत्री यांनी लवकरच शिवसेना सभासद नोंदणी सुरु होत असुन अधिकाधीक नोंदणी करुण घेण्याबाबत आवाहन शिवसैनिकांना केले.यावेळी मा आ,संजय गावंडे ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे ,मायाताई मैसने महिला आघाडी जिल्हा संघटिका ,शाम गावंडे शिवसेना तालुका प्रमुख ,सुनील रंदे शहर प्रमुख लक्षमीताई सरीसे महिला आघाडी उपजिल्हा संघटिका विजय ढेपे,न्यानेश्वर ढोले ,रमेश खिरकर,रोशन पर्वतकर,अमोल पालेकर नंदकुमार बोन्द्रे, उमेश आवारे, अनिल ढोबळे ,प्रशांत येउल, गजानन कोलखेडे, संजय भट्टी ,रणजित कहार ,विजय भारसकाळे, विलास सरीसे ,दिनेश ठाकूर, गोपाल कावरे, प्रफुल्ल बोरकुटे ,शुभम मैसने, प्रफुल्ल डीक्कर ,लाला कोटक ,धीरज बेलसरे ,देव नृपणारायन, पिंटू वानखेडे, सुनील डांगते ,गणेश सरीसे, यासह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप बोचे तर आभार शाम गावंडे यानी मानले.