• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 19, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

शाळा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

Team by Team
June 18, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
discussion for School_Papalkar
12
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१८- शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी शाळा टप्प्या टप्प्याने सुरु करण्यासाठी शासनाने सविस्तर निर्देश जारी केले आहेत. जिल्ह्यातील शाळा त्याच पद्धतीने सुरु करण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील शाळा टप्प्या टप्प्याने सुरु करण्याबाबत नियोजन करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. वैशाली ठग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडके तसेच सर्व उपशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यावेळी शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ सुरु करण्याबाबत शासनाने दि.१५ जून रोजी जारी केलेल्या परिपत्रकाची माहिती देण्यात आली. त्यानुसार शाळा ह्या टप्प्या टप्प्याने सुरु करतांना प्रथम जुलै महिन्यात इयत्ता ९ वी, १० वी व १२ वी हे वर्ग सुरु होतील. त्यानंतर ऑगस्ट मध्ये इयत्ता सहावी ते आठवी चे वर्ग सुरु होतील. सप्टेंबर मध्ये इयत्ता तिसरी ते पाचवी चे वर्ग सुरु होतील. इयत्ता पहिली व दुसरीचे वर्ग केव्हा सुरु करायचे याबाबत स्थानिक पातळीवर शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावा. तसेच इयत्ता अकरावीचे वर्ग हे इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुरु करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.

शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापनाने पूर्व तयारी पंधरवडा राबवावयाचा आहे. त्यात शाळा व्यवस्थापन समितीची (ऑनलाईन) सभा आयोजित करणे, पाठ्यपुस्तक वितरण, शाळेच्या इमारतीचे स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, गटागटाने पालकांच्या सभा घेणे, शाळा बाह्य मुलांच्या घरी भेटी देणे, शालेय विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकाचे अद्यावतीकरण करणे. ग्रामपंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडिओ, कॉम्प्युटर यांची सुविधा उपलब्ध करुन मुलांना मदत करणे, गुगल क्लासरुम, वेबिनार, डिजीटल शिक्षणासाठी शिक्षक व पालकांचे सक्षमीकरण करणे, दीक्षा ॲपचा प्रसार, इ-कन्टेंट निर्मिती इ. बाबत तयारी करण्यात येणार आहे.

या पद्धतीने सर्वअंमलबजावणी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी दि.२६ जून रोजी हजर व्हावे. हजर होतांना त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असे यावेळी सांगण्यात आले. जेथे नियुक्ती आहे तेथेच शिक्षकांनी रहावे, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.

Tags: अकोलाजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
Previous Post

घरोघरी आरोग्य तपासणीत निदर्शनास आलेल्या लोकांचे दोन दिवसात ३३१ स्वॅब जमा

Next Post

पेट्रोलियम क्षेत्रातील मोठी कंपनी ब्रिटीश पेट्रोलियम (BP) पुण्यात जागतिक व्यापार सेवा केंद्र स्थापन करणार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
ब्रिटीश पेट्रोलियम

पेट्रोलियम क्षेत्रातील मोठी कंपनी ब्रिटीश पेट्रोलियम (BP) पुण्यात जागतिक व्यापार सेवा केंद्र स्थापन करणार

corona

अकोल्यात कोरोना मीटर सुरूच आज १५ रुग्णांची भर तर एकाचा मृत्यू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.