• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आरोग्य सर्वेक्षणात आढळलेल्या संदिग्ध व्यक्तिंच्या चाचण्या प्राधान्याने पूर्ण करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू

Team by Team
June 17, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
health-survey_bacchu kadu
14
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१६- शहरात राबविण्यात आलेल्या घरोघरी आरोग्य सर्वेक्षण करण्याच्या मोहिमेत ज्या संदिग्ध व्यक्ती आढळल्या अथवा ज्या व्यक्ती जोखमीच्या वाटतात अशा व्यक्तिंच्या चाचण्या येत्या तीन दिवसांत पूर्ण कराव्या, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सायंकाळी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबैठकीस विधानपरिषद सदस्या आ. अमोल मिटकरी, विधान सभा सदस्य आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल, डॉ. पवार, डॉ. अष्टपुत्रे, डॉ. शिरसाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपा उपायुक्त आवारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यावेळी पालकमंत्री ना. कडू यांनी वाढत्या मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली. वाढता मृत्यू दर कमी करण्यासाठी आणखी चाचण्या करणे आवश्यक आहे. तसेच वैद्यकीय मानकांनुसार सर्वेक्षणात ज्यांची तब्येत जोखमीची वाटते अशा लोकांचे म्हणजेच ज्यांना पुर्वीचे आजार आहेत, ज्यांची ऑक्सिजन पातळी कमी आहे, ज्यांना श्वसनाचा आजार आहेत, ज्यांचे वय ६० वर्षाच्या वर आहे, अशा लोकांच्या तातडीने चाचण्या होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी माहिती देण्यात आली की, प्रतिबंधित क्षेत्राचे सर्वेक्षण पुर्ण असून ऑक्सिजन पातळी कमी असलेले २१८ व सर्दी, पडसे, ताप असलेले ७४ व्यक्ती आढळून आले. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ६० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यात ऑक्सिजन पातळी कमी असलेले ४४० व्यक्ती आढळून आले आहेत. अशा सर्व लोकांच्या चाचण्या करण्यात याव्या असे निर्देश ना. कडू यांनी दिले. समाजामध्ये नकारात्मक भावना ही घातक आहे, ती घालविण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्या अशी सुचना त्यांनी दिल्या.

वाढत्या रुग्णसंख्या पाहता रुग्णांच्या व्यवस्थेबाबतही माहिती देण्यात आली. तसेच त्यासाठी आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व रुग्णसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाचे पुरेसे नियोजन करावे. आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने वेळीच पुरविण्यात यावी. दाखल रुग्णाना देण्यात येणारे जेवणाचा दर्जा उत्तम राखा, त्यांना अधिक पौष्टिक आहार देता येईल का याबाबत विचार करावा, असे निर्देशही ना. कडू यांनी दिले.

Tags: अकोलाजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरपालकमंत्री ना.बच्चू कडू
Previous Post

फळपीक विमा योजनेत अधिकाधिक संत्रा उत्पादक शेतक-यांचा समावेश व्हावा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

Next Post

अकोल्यात नऊ रुग्णांची भर, आकडा १०८२ पार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
corona

अकोल्यात नऊ रुग्णांची भर, आकडा १०८२ पार

sushant singh rajput

सुशांत आत्महत्या : सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात खटला दाखल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.