तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा शहरातील मुख्य गटारी व नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणवर गाळ व कचऱ्याचे ढिग लागले आहेत त्यामुळे येणाऱ्या मान्सून काळात नाल्यामधील पाणी ओहर फ्लो होऊन परिसरात पसरणार आहे.म्हणून मान्सूनपूर्व गटारी व नाल्याची स्वच्छता नगर परिषद प्रशासनाने करावी या करीता तेल्हारा युवासेनेच्या वतीने त निवेदन आले आहे .
तेल्हारा शहरातील मुख्य गटारी व नाल्यांमध्ये मध्ये मोठया प्रमाणावर घाण व कचऱ्यांचे ढिग लागले आहेत त्यामुळे आगामी मान्सून काळात गटारी व नाल्यामधील पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरणार आहे . व त्या पासून साथीच्या रोगां पसरण्याची भीती नाकारता येत नाही. त्याच बरोबर शहरात मोठ्या प्रमाणावर मच्छर व कीटकांचा संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून जण सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नगर परिषद कडून कुठलीही उपाय योजना करण्यात आलेली नाही ,जगतगुरु संत तुकाराम महाराज चौक परिसरातील मुख्य गटारी मध्ये कचऱ्याने तुडुंब भरल्या असून नालीवरचे कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंध पसरत आहे . यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्याच बरोबर मागील अनेक वर्षांपासून शहरात मच्छर , कीटकनाशक फवारणी करण्यात आलेली नाही तरी मान्सून पूर्व साफसफाई करून शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात यावी याकरिता युवासेना पदाधीकारी यांनी तेल्हारा पालिकेला निवेदन देऊन आठ दिवसांच्या आत मानसुपूर्व साफसफाई करून फवारणी करण्यात यावी अन्यथा युवासेनेच्या स्टाईल ने आंदोलन करु असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे .
या निवेदनावर युवासेना शहर प्रमुख राम वाकोडे , जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे , प्रज्वल मोहोड ,स्वप्नील सुरे , सुरज देशमुख , ,अमित घोडेस्वार , गोलू सोनटक्के , अजय वासनकार , श्रेयस सोनटक्के,आदेश महल्ले ,किशोर डांबरे , आशिष राठोड , अक्षय गावंडे , अभिजित बगलकर , चेतन गावंडे , रोहन पोहरकर , मनोज सुगंधी , सागर भोगे , सुरज माजोडकार ,सुरज इंगळे ,अंकुश आठवले , मनोज चाफे, गोपाळ बाभुळकर , योगेश सोनोने, दीपक गावत्रे ,मनोज सोनोने ,शैलेश ढाळे ,इत्यादी युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानच्या स्वाक्षऱ्या आहेत