तेल्हारा (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावा मूळे शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केल्यामुळे अनेकांचे व्यवसाय बंद पळले त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून ते आर्थिक अडचणीत सापळल्यामुळे नगर परिषद ने व कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांचे दुकान भाळे माफ करण्यात यावे अशी मागणी तेल्हारा तालुका व शहर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने पालिका व बाजार समिती कळे मागणी केली आहे.
सर्वत्र कोरोना विषाणूचा
प्रादुर्भाव वाढल्यामुळे केंद्रासह राज्यामध्ये लॉकडाऊन केल्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेकांचे व्यवसाय डबघाईस आले असल्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे अश्या मध्ये शासनाच्या आवाहना नुसार अनेकांनी सहानुभूती पूर्वक विचार करून घरभाडे माफ केले . गेल्या चार ते पाच महिन्यांपासून संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे व या मध्ये सलून , पानपट्टी व हॉटेल सह अनेक व्यवसाईकांना आपली दुकाने उघळण्याची बंदी असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे ते आर्थिक संकटात सापळले आहेत तरी तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागे मध्ये तसेच तेल्हारा नगर परिषद च्या जागे मध्ये ज्यांनी सलून व हॉटेल सह अनेक व्यवसायकरिता जागा भाड्याने घेतली आहे त्यांचा सहानुभूती पूर्वक विचार करून त्यांचे चार ते पाच महिन्याचे जागा भाडे माफ करावे अशी मागणी अध्यक्ष व मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा व सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या कळे शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड, युवा सेना जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे, शिवसेना माजी शहर प्रमुख पप्पूसेठ सोनटक्के सेना उपतालुका प्रमुख अजय गावंडे, रामभाऊ फाटकर , निलेश धनभर , विवेक खारोडे , सागर सारवान इत्यादीनी निवेदन देऊन केली आहे.