अकोट (शिवा मगर): अकोला पूर्व मतदार संघातील दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत चोहोटा बाजार येथे बऱ्याच वर्षापासून पोलीस चौकी आहे, या चौकी मध्ये सर्व 26 गावे आहेत, विशेष म्हणजे चोहोटा येथे जवळ पास 225ते 250 विट भट्या आहेत त्यावर 3500 ते 4000 मजूर काम करत अस तात, आणि देवरी फाटा = गांधिग्राम पर्यंत अकोट ते अकोला मुख्य रस्ता आहे, या रस्त्यावर अधून मधून लहान मोठे अपघात होत असतात यात बऱ्याच लोकांचा जीव गेला आहे हे मागील आकडे वारी वरून दिसून येते, याची सर्व जबादारी फक्त 04 पोलीस अमलदाराच्या खांद्यावर आहे, त्यांच्या कर्तव्यात थोडासाही कसूर वरिष्ठांना दिसून आल्यास त्याच्यावर निलंबन सारखया कारवाया मागील कही दिवसात करण्यात आल्या आहेत, परंतु ज्या मुख्य रस्त्यावर पोलीस चॉकी आहेत ती मोठ्या प्रमा नात नादुरूस्त आहे कधी अंगावर पडून जीवित हानी होऊ शकते, पावसाळ्यात पोलीस चौकीत पाणी साचत असते परंतु या गंभीर बाबीकडे ना कोणी वरिष्ठ अधिकारी लक्ष देतात ना लोक प्रतिनिधी !!!
………………………………..
पोलीस चौकीवर मनुष्य बळाची कमतरता
………………………………..
चोहोटा बाजार ही जवळपास ८० गावांची बाजारपेठ ,व राज्य महामार्ग जात असल्याने या ठिकाणी 01 पोलीस अधिकारी,10 पोलीस कर्म चारी कर्तव्यात असणे गरजेचे आहे परंतु या ठिकाणी फक्त o4 पोलीस कर्मचारी काम पाहतात