वाडेगांव (डॉ चांद शेख)- आज वाडेगांवात आढला १६ वा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण प्राप्त माहीतीनुसार वाडेगांवातील सोफी चौक भागात एक ६० वर्षीय पुरुष हा कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढला असून तो भाग सिल करून त्या भागात आरोग्य विभागाकडून घरो घरी जाऊन तपासनी करण्यात येत आहे. आता वाडेगांव व इंदीरा नगर या भागातील रूग्नाची संख्या १६ झाली असून सुरक्षीत रहा घरातच रहा, घाबरू नका काळजी घ्या, विनाकाराण घरा बाहेर पडू नका, असे ग्रामपंचायत मार्फत गावात सांगण्यात आले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हाडोळे मॅडम, उपविभागीय अधिकारी समाधान वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी शोळंके, ठाणेदार नितीन सिंदे, ए पी आय महादेव पडघन , ग्रामविकास अधिकारी डी . एस .अंभोरे, सरपंच अन्नपुर्णा मानकर ,डॉ घुगे मॅडम, डॉ चुगळे मॅडम, तलाठी ताथोड, कोतवाल नारायण घाटोळ,पोलीस कर्मचारी विनायक पवार, गावंडे, नईम, पत्रकार मंडळी, गावातील प्रतिष्ठीत नागरीक इत्यादी उपस्थीत होते.
पहिल्या रूग्णा च्या संपर्कातील जे २७ संशीयतीतांना क्वारंटाईन केले होते त्यातील २६ लोकांचे अहवाल हे निगेटीव्ह आलेले आहेत एका जणाचा अहवाल येणे बाकी आहे तो ही अहवाल निगेटीव्ह येण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरीकांनी घाबरण्याचे कारण नाही. घरीच रहा सुरक्षीत रहा सोशल डिस्टंसिंग पाळा कामाशिवाय बाहेर पडु नका अशी माहीती सरपंच अन्नपुर्णा मानकर यांनी दिली.