• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

१९० अहवाल प्राप्तः ५९ पॉझिटीव्ह, एक मयत

Team by Team
June 12, 2020
in अकोला, Corona Featured, Featured, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
80 0
0
corona
12
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१२- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १९० अहवाल प्राप्त झाले. त्यातील १३१ अहवाल निगेटीव्ह तर ५९ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज एका रुग्णांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ९७३ झाली आहे. आजअखेर ३२३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ७१२१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६८२२, फेरतपासणीचे ११५ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७०५८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६०८५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ९७३ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

आज ५९ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात ५९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी प्राप्त अहवालात २२ महिला व २७ पुरुषांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पूरपिडीत कॉलनी येथील नऊ, अकोट फैल येथील सात, शिवर येथील चार, बाळापूर येथील तीन, मोठी उमरी येथील तीन, खदान येथील तीन, रेल्वे क्वार्टर येथिल तीन, गुलजार पुरा येथील तीन, सिंधी कॅम्प येथील दोन, पातूर येथील दोन, जुने शहर येथील दोन, तर तारफैल, संतोषीमाता मंदिर जवळ, छोटी उमरी, गितानगर, विजय नगर, शंकर नगर, भगतवाडी डाबकी रोड, टेलिफोन कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

आज सायंकाळी प्राप्त अहवालात १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एका दोन महिने वयाच्या बालिकेसह नऊ महिला व एक पुरुष रुग्णाचा समावेश आहे. त्यातील पाच जण हे रंगारहट्टी बाळापुर येथील रहिवासी आहेत. उर्वरीत बाळापुर, सिंदखेड ता. बार्शी टाकळी, विजयनगर, हमजा प्लॉट, चैतन्य नगर येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

एक मयत

दरम्यान काल (दि.११) रात्री एका ७८ वर्षीय पुरुष रुग्णाचे उपचार घेतांना निधन झाले. हा रुग्ण बाळापूर येथील रहिवासी होता. त्यास दि. ७ जून रोजी दाखल करण्यात आले होते.

२९ जणांना डिस्चार्ज

दरम्यान काल (दि.११) सायंकाळनंतर नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यातील चार कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले. त्यात पाच महिला व दोन पुरुष आहेत. त्यातील दोघे गायत्रीनगर येथील तर अकोट फैल, गुलशन कॉलनी, हिंगणाफाटा, रामदास पेठ, हरिहर पेठ, सिंधी कॅम्प व खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान आज दुपारनंतर २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला . त्यात ११ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित नऊ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात १५ पुरुष तर पाच महिला रुग्ण आहेत. त्यातील पाच जण खदान येथील, तीन जण माळीपुरा येथील, तर कैलाश टेकडी , व्यकंटेश नगर, संत कबीर नगर, गुलजार पुरा, सिंधी कॅम्प, टॉवर चौक, रामदास पेठ, मलकापुर, तेलीपुरा, जठारपेठ, सिटी कोतवाली, शिवसेना वसाहते येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

३२३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत ९७३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ४४ जण (एक आत्महत्या व ४३ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ६०६ आहे. तर सद्यस्थितीत ३२३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: अकोलाकोविड १९
Previous Post

प्रलंबित शिष्यवृत्ती रकमेसाठी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याचा तपशिल दि.१७ पर्यंत सादर करण्याचे आवाहन

Next Post

विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
divisional-commissioner

विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

Aadhar Card

आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र सुरु करण्यास सशर्त परवानगी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.