अकोला– सार्वजनिक आरोग्य विभागाचा दि.२३ मे २०२० च्या शासन निर्णयानुसार कोविड-१९ साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना अधिकृत रुग्णालयामार्फत उपलब्ध करुन देणेबाबत निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ लोकांना मिळावा यासाठी अंगिकृत १२ रुग्णालयांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी निर्देशित केले आहे.
यासंदर्भात आज जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, अकोला जिल्ह्यातील रुग्णांना या सुविधांचा लाभ मिळविण्याच्या दृष्टीकोनातून व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरील रुग्णांचा असलेला भार कमी करण्यासाठी त्यांचेकडे भरती असलेल्या Non-Covid व Negative संशयीत रुग्ण यांना इतर रुग्णालयामध्ये संदर्भीत भरती करुन त्यांच्यावर योग्य उपचार करणे बंधनकारक आहे. त्यासाठी खालील नमुद अंगिकृत रुग्णालयांना निर्देशीत केले आहे.
रुग्णालयांची यादी-
1. | अवघते हॉस्पीटल, अकोला | 2. | सीटी हॉस्पीटल, अकोला |
3. | के.एस.पाटील हॉस्पीटल, अकोला | 4. | माऊली मॅटरनिटी हॉस्पीटल, अकोला |
5. | मुरारका हॉस्पीटल, अकोला | 6. | संत तुकाराम हॉस्पीटल, अकोला |
7. | श्रीमती बी.एल.चांडक रिसर्च फाऊंडेशन | 8. | विठ्ठल हॉस्पीटल, अकोला |
9. | रिलायंस हॉस्पीटल, अकोला | 10. | शुक्ल चिल्ड्रेन हॉस्पीटल, अकोला |
11. | बबन हॉस्पीटल, मुर्तिजापूर | 12. | मेहरे ऑर्थोपेडीक |
समन्वय ठेवण्यासाठी समिती–
- डॉ. अश्विनी खडसे, जिल्हा समन्वय अधिकारी
- डॉ. श्रीकांत टेकाडे,
- डॉ. प्रकाश डिक्कर, जिल्हा मेडीकल आफीसर
- डॉ. फारुकी महानगरपालीका
- डॉ. राजेश पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
- डॉ. रमेश पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
समितीने करावयाची कार्यवाही–
- उपरोक्त गठीत समितीने नॉन कोविड रुग्ण हा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेस पात्र आहे. किंवा कसे याबाबत शहानिशा करावी.
- रुग्णास या योजनेचा समावेश असलेल्या रुग्णालयामध्ये पाठविण्यात यावे.
- अशा रुग्णालयातील रिक्त बेड बाबत दररोज सकाळ/संध्याकाळ खातरजमा करुन घ्यावी.
- जिल्हा शल्य चिकित्सक अकोला यांचेकडून रुग्णाकरीता रुग्णवाहीकेची व्यवस्था करुन घेण्यात यावी.
- कोविड-१९ ची टेस्ट झाली किंवा कसे याबाबत खातरजमा करावी.
- त्यानंतर रुग्णालयाने रुग्णास भरती करुन घ्यावे., भरती करतेवेळी रुग्णाकडून रहिवाशी पुरावा म्हणून लाभार्थी प्रमाणपत्र, रेशनकार्ड, तहसिलदार दाखला, अधिवास पुरावा, शासनाचे वितरीत केलेले छायांकित ओळखपत्र घेण्यात यावे.
- संबंधित रुग्णास भरती करुन त्यांचेवर उपचार करणे बंधनकारक राहील.
- याबाबत समिती अचानकपणे तपासणी करेल.
- प्रत्येक रुग्णालयाने समन्वय अधिकारी नियुक्त करणे बंधनकारक राहील.
- या योजनेच्या अंमलबजावणीबाबत कोणत्याही अडीअडचणी आल्यास अधिष्ठाता शासकीय महाविद्यालय अकोला व जिल्हा शल्य चिकीत्सक अकोला यांनी सोडवाव्यात.
- याबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावा,
- जिल्हा शल्य चिकित्सक,अकोला यांनी उपरोक्त सर्व बाबींचे नियंत्रण करावे.
असे स्पष्ट करण्यात आले आहे.