पातुर (सुनील गाडगे)- पोलीस स्टेशन तसेच कोरोना पथक यांच्या संयुक्त कारवाईमुळे पातुर शहर व परिसरामध्ये मोटर सायकल नियमाचे उल्लंघन करणारे तसेच कोव्हिड-19 भयावह महामारी चा वाढता प्रादुर्भाव असल्याने काही नागरिक मास्क चा वापर न करता तसेच विनाकारण घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करत असल्याचे जास्त आढळत असल्याने व बाजारा मध्ये गर्दी करून सोशल डिस्टंसिंग न पाळता विनाकारण फिरत असल्याचे आढळल्यास कोरोना जास्त प्रसार होऊ नये म्हणून पातुर पोलीस स्टेशन व कोरोना पथक यांनी मास्क चा वापर न करणारे एकूण 19 नागरिकांकडून 3800 दंड वसूल करून त्या नागरिकांना ताकीद देण्यात आले व पातूर पोलीस स्टेशनच्या वतीने मोटारसायकल नियमांचे उल्लंघन करणारे मोटर सायकल, वाहन भरधाव वेगाने चालवणे व चालवण्याचा परवाना त्यांच्याकडे नाही असे वाहनांनवर कारवाई करून एकूण 26 वाहनांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून 5200 रुपये दंड वसूल करण्यात आला . यावेळी पातुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठाकूर साहेब . उपनिरीक्षक अमोल गोरे साहेब. आणि कोरोणा पथकाचे ग्राम विकास अधिकारी राहुल उंदरे यांनी संयुक्त मोहीम राबवली यावेळी पातुर पोलिस स्टेशनचे कर्मचारी सोहेल खान, मनीष घुगे, कोरोणा पथकाचे सहकारी ग्रामसेवक अक्षय गाडगे, प्रमोद उगले, यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.