• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना: नॉन कोवीड रुग्णांवर उपचारासाठी अंगिकृत १२ रुग्णालयांना निर्देश

Team by Team
June 10, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
Mahatma Janaarogya Yojna
15
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.९- सार्वजनिक आरोग्य विभागाचा दि.२३ मे २०२० च्या शासन निर्णयानुसार कोविड-१९ साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना अधिकृत रुग्णालयामार्फत उपलब्ध करुन देणेबाबत निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ लोकांना मिळावा यासाठी अंगिकृत १२ रुग्णालयांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी निर्देशित केले आहे.

यासंदर्भात आज जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, अकोला जिल्ह्यातील रुग्णांना या सुविधांचा लाभ मिळविण्याच्या दृष्टीकोनातून व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरील रुग्णांचा असलेला भार कमी करण्यासाठी त्यांचेकडे भरती असलेल्या Non-Covid व Negative संशयीत रुग्ण यांना इतर रुग्णालयामध्ये संदर्भीत भरती करुन त्यांच्यावर योग्य उपचार करणे बंधनकारक आहे. त्यासाठी खालील नमुद अंगिकृत रुग्णालयांना निर्देशीत केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

रुग्णालयांची यादी-

1. अवघते हॉस्पीटल, अकोला 2. सीटी हॉस्पीटल, अकोला
3. के.एस.पाटील हॉस्पीटल, अकोला 4. माऊली मॅटरनिटी हॉस्पीटल, अकोला
5. मुरारका हॉस्पीटल, अकोला 6. संत तुकाराम हॉस्पीटल, अकोला
7. श्रीमती बी.एल.चांडक रिसर्च फाऊंडेशन 8. विठ्ठल हॉस्पीटल, अकोला
9. रिलायंस हॉस्पीटल, अकोला 10. शुक्ल चिल्ड्रेन हॉस्पीटल, अकोला
11. बबन हॉस्पीटल, मुर्तिजापूर 12. मेहरे ऑर्थोपेडीक

समन्वय ठेवण्यासाठी समिती-

1. डॉ. अश्विनी खडसे, जिल्हा समन्वय अधिकारी
2. डॉ. श्रीकांत टेकाडे,
3. डॉ. प्रकाश डिक्कर, जिल्हा मेडीकल आफीसर
4. डॉ. फारुकी महानगरपालीका
5. डॉ. राजेश पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
6. डॉ. रमेश पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

समितीने करावयाची कार्यवाही-

1. उपरोक्त गठीत समितीने नॉन कोविड रुग्ण हा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेस पात्र आहे. किंवा कसे याबाबत शहानिशा करावी.
2. रुग्णास या योजनेचा समावेश असलेल्या रुग्णालयामध्ये पाठविण्यात यावे.
3. अशा रुग्णालयातील रिक्त बेड बाबत दररोज सकाळ/संध्याकाळ खातरजमा करुन घ्यावी.
4. जिल्हा शल्य चिकित्सक अकोला यांचेकडून रुग्णाकरीता रुग्णवाहीकेची व्यवस्था करुन घेण्यात यावी.
5. कोविड-१९ ची टेस्ट झाली किंवा कसे याबाबत खातरजमा करावी.
6. त्यानंतर रुग्णालयाने रुग्णास भरती करुन घ्यावे., भरती करतेवेळी रुग्णाकडून रहिवाशी पुरावा म्हणून लाभार्थी प्रमाणपत्र, रेशनकार्ड, तहसिलदार दाखला, अधिवास पुरावा, शासनाचे वितरीत केलेले छायांकित ओळखपत्र घेण्यात यावे.
7. संबंधित रुग्णास भरती करुन त्यांचेवर उपचार करणे बंधनकारक राहील.
8. याबाबत समिती अचानकपणे तपासणी करेल.
9. प्रत्येक रुग्णालयाने समन्वय अधिकारी नियुक्त करणे बंधनकारक राहील.
10. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत कोणत्याही अडीअडचणी आल्यास अधिष्ठाता शासकीय महाविद्यालय अकोला व जिल्हा शल्य चिकीत्सक अकोला यांनी सोडवाव्यात.
11. याबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावा,
12. जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला यांनी उपरोक्त सर्व बाबींचे नियंत्रण करावे.
असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags: अकोलाजितेंद्र पापळकरमहात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना
Previous Post

जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाबाबत आढावा: घरकुलाच्या कामांसाठी गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

Next Post

संकटाच्या काळात एकत्र येऊन काम करण्याची गरज-पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे आयएमएच्या बैठकीत प्रतिपादन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
bacchu kadu

संकटाच्या काळात एकत्र येऊन काम करण्याची गरज-पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे आयएमएच्या बैठकीत प्रतिपादन

corona-positive

अमरावती मध्ये कोरोना सत्र सुरूच,  अचलपुरातील आणखी 15 जणांचे विलगीकरण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.