• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोट – तेल्हारा रस्ता आठ दिवसांत पूर्ण करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

Team by Team
June 10, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
87 1
0
bacchu kadu
14
SHARES
625
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.९- अकोट ते तेल्हारा या रस्त्याच्या कामास आतापर्यंत झालेल्या खर्चाचा विचार करता काम बरेचसे अपूर्ण आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत या रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील अकोट ते तेल्हारा, अकोट ते अकोला व शेगाव- देवरी या रस्त्यांच्या कामाचा आढावा आज आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी माहिती देण्यात आली की, अकोट ते तेल्हारा या २७ किमीच्या रस्त्याच्या कामावर आतापर्यंत १२ कोटी रुपयांचा खर्च झाला असून अद्याप केवळ मातीकामच झालेले दिसते. येत्या पावसाळ्यात या रस्त्यावरुन रहदारीस लोकांना त्रास होईल. तेव्हा आतापर्यंत झालेल्या खर्चाचा हिशेब द्यावा व उर्वरित काम हे येत्या आठ दिवसांच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश ना. कडू यांनी यंत्रणेला दिले. तसेच अकोट ते अकोला व शेगाव ते देवरी या रस्त्यांच्या अनुक्रमे ४०० मीटर व २०० मीटर भागात रुंदीकरणाची हद्दी ही वन विभागात येत असल्याबाबत संबंधित विभागाची मंजूरी घ्यावी. वन हद्द सोडून उर्वरित भागात काम वेगाने सुरु करावे, असेही त्यांनी निर्देशित केले. तर अकोला अकोट या रस्त्याची आधी एक बाजू पूर्ण करुन मग दुसरी बाजूचे काम करावे, असे निर्देश ना. कडू यांनी दिले.

Tags: अकोलातेल्हारापालकमंत्री ना.बच्चू कडू
Previous Post

कमी जोखमीच्या लोकांवरही लक्ष द्या-पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

Next Post

जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाबाबत आढावा: घरकुलाच्या कामांसाठी गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Instruction of bacchu kadu

जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाबाबत आढावा: घरकुलाच्या कामांसाठी गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

Mahatma Janaarogya Yojna

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना: नॉन कोवीड रुग्णांवर उपचारासाठी अंगिकृत १२ रुग्णालयांना निर्देश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.