अकोला,दि.८ – हवामान विभाग नागपूर यांनी दिलेल्या संदेशानुसार विदर्भातील सर्व जिल्ह्यात दि.९ ते १२ जून पर्यंत अतिवृष्टी, वादळ, गारपीट, वीज कोसळणे इ. नैसर्गिक आपत्तींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तरी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, आरोग्य विभागाचे कर्मचारी व अन्य क्षेत्रिय कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी उपस्थित रहावे असे ,निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
अधिक वाचा : पालकमंत्री ना. बच्चू कडू मंगळवारी (दि.९) जिल्हादौऱ्यावर