अकोट (शिवा मगर ):भारतात आताची परस्तीती बगता कोरोना महामारी ने ग्रस्त आहे, या महामारीचा काळात रक्ताचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे रक्तनदानाची साध्या खूप गरज आहे. ही गरज लक्षात घेता अकोट मधे राज्यभिषेक दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्टान अकोट चा वतीने 6जून ला रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
तसेच या शिबिराचे आयोजन सचिन पांडव,वैभव खंडेकर यांनी केले. शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अकोला जि. सह्याद्री प्रतिष्ठान चे अभिजित कोकाटे, ऋषी हिंगणकार, प्राणीकलेश प्रतिबंधक समिती अकोला जि. सदस्य आकाश रावनकार तसेच अकोट चे तहसीलदार गुरव साहेब यांनी आपला वेळेतील वेळ कडून शिबीराला भेट दिली. अंबरीश पांडे, किशोर पांडव, शिवा गीते,गजू मुराठे, अनिकेत कुलट, सोपान बोचे,भिजीत कोकाटे,सुदर्शन गायकवाड,अभिजित जवंजाळ,यश महल्ले,अक्षय ममनकार, सागर मार्के, ऋषभ भाषकर,आणि संपूर्ण अकोट सह्याद्री प्रतिष्टान मित्र मंडळ चा वतीने पार पडला.
शिबीर सकाळी 9ते सायंकाळी5 पर्यंत चालले,तसेच रक्तदान करताना योग्य ती काळजी आणि सोशल डिस्टनसिंग ठेऊन रक्तदान पार पडले.ऐकून 72 रक्तदात्यांनी आपले रक्त दान केले याप्रसंगी बी.पी.ठाकरे रक्तपेढी यांचे मोलाचे सहकार्य हेते सचिन पांडव, वैभव खंडेकर ,अनिकेत कुलट,आकाश रावनकार(प्राणीकलेश प्रतिबंध सो. अकोला जि. सदस्य),किशोर पांडव,सागर मार्के यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर पार पडले.