• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आभासी जागतिक लस शिखर परिषदेला पंतप्रधानांनी केले संबोधित या आव्हानात्मक काळात भारत जगाबरोबर एकजुटीने उभा आहे- पंतप्रधान

गवी आंतरराष्ट्रीय लस आघाडीला 15 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देण्याचे भारताचे वचन

Media Desk by Media Desk
June 5, 2020
in Featured, आंतराष्ट्रीय
Reading Time: 1 min read
79 1
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी
58
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: गवी या आंतरराष्ट्रीय लस आघाडीला  15 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देण्याचे भारताने आज वचन दिले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आयोजित केलेल्या आभासी जागतिक लस शिखर परिषदेला  पंतप्रधान  नरेंद्र मोदी संबोधित करत  होते,  ज्यात 50 पेक्षा जास्त देशांचे – उदयोजक,  संयुक्त राष्ट्र संस्था ,  नागरी संस्था, सरकारचे  मंत्री, राष्ट्र प्रमुख आणि देशांचे  नेते सहभागी झाले होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले की, या आव्हानात्मक काळात भारत जगाबरोबर एकजुटीने उभा आहे

मोदी म्हणाले, भारताची सभ्यता जगाकडे एक कुटुंब म्हणून पहायला शिकवते आणि या महामारीच्या काळात त्याने हे शिक्षण प्रत्यक्ष जगण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, भारताने 120  हून अधिक देशांना  औषधांचा साठा पुरवला असून शेजारच्या देशात एक सामायिक प्रतिसाद धोरण आखून आणि ज्या देशांनी  मदत मागितली त्यांना विशिष्ट मदत देताना भारताच्या स्वत: च्या मोठ्या लोकसंख्येचे रक्षणही  केले.

पंतप्रधान म्हणाले, कोविड 19 महामारीने काही प्रमाणात जागतिक सहकार्याच्या मर्यादा उघडकीस आणल्या आहेत आणि अलिकडच्या इतिहासात प्रथमच मानवजातीला समान शत्रूचा सामना करावा लागला आहे.

गवीचा संदर्भ देताना ते म्हणाले की, ही केवळ जागतिक आघाडीच नाही तर जागतिक एकजुटीचे प्रतीक आहे आणि इतरांना मदत करून आपणही स्वतःला मदत करू शकतो याचे स्मरण आहे.

ते म्हणाले की, भारताकडे मोठी लोकसंख्या आणि मर्यादित आरोग्य सुविधा आहेत आणि त्याला लसीकरणाचे महत्त्व समजते.

पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या सरकारने सुरू केलेल्या पहिल्या कार्यक्रमांपैकी एक म्हणजे मिशन इंद्रधनुष, ज्याचे उद्दीष्ट  देशातील मुले आणि गर्भवती महिलांचे  संपूर्ण लसीकरण सुनिश्चित करणे  ज्यात विशाल राष्ट्राच्या दुर्गम भागाचाही समावेश आहे.

पंतप्रधान म्हणाले की, संरक्षण वाढवण्यासाठी भारताने आपल्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात सहा नवीन लसींची भर घातली आहे.

पंतप्रधानांनी स्पष्ट केले की भारताने आपल्या संपूर्ण लस पुरवठा मार्गाचे डिजिटायझेशन  केले आहे आणि शीतगृहांच्या अखंडतेवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक लस गुप्तहेर यंत्रणा विकसित केली  आहे.

या नवसंशोधनांमुळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत योग्य वेळी योग्य प्रमाणात सुरक्षित आणि सामर्थ्यवान लसीची उपलब्धता सुनिश्चित केली जात  आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, जगातील लस उत्पादनातही भारत अग्रेसर आहे आणि जगातील सुमारे 60 टक्के मुलांच्या लसीकरणात आपले योगदान देणे भाग्याची गोष्ट आहे.

मोदी म्हणाले, गावीचे  कार्य  भारताला माहित आहे आणि त्याचे महत्त्व  भारत जाणतो.  म्हणूनच तो गावीच्या मदतीसाठी  पात्र असूनही गावीसाठी  देणगीदार बनला आहे.

पंतप्रधान म्हणाले की गावीला भारताकडून केवळ आर्थिक मदत नाही तर भारताच्या प्रचंड मागणीमुळे सर्वांसाठी लसींची जागतिक किंमत कमी झाली असून गेल्या पाच वर्षात गावीसाठी सुमारे 400 दशलक्ष डॉलर्सची बचत झाली.

कमी किमतीत दर्जेदार औषधे आणि लस तयार करण्याची सिद्ध क्षमता, लसीकरण जलदगतीने विस्तारित करण्याचा स्वतःचा देशांतर्गत अनुभव आणि त्याची महत्त्वपूर्ण वैज्ञानिक संशोधनाची क्षमता यासह भारत जगाबरोबर एकजुटीने उभा असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

जागतिक आरोग्य प्रयत्नांना हातभार लावण्याची केवळ क्षमता भारतामध्ये नाही तर ती सामायिक करण्याची आणि काळजी घेण्याच्या भावनेने ते करण्याची इच्छा देखील असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

कत्तली करिता आणलेल्या १६ गौवंशाची पोलिसांनी केली सुटका

Next Post

आज जिल्हयात २८ पैकी १४ पॉझिटिव्ह १४ निगेटिव्ह, आकडा ७२६ वर

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
कोरोना व्हायरसची हि लक्षणं कोणती, त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?

आज जिल्हयात २८ पैकी १४ पॉझिटिव्ह १४ निगेटिव्ह, आकडा ७२६ वर

Jitendra Papalkar

आयएमएच्या डॉक्टर्सची सेवा कोवीड कक्षात; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.