दहीहंडा(कुशल भगत)-अकोट तालुक्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत १६ गोवंशाना जीवनदान दिले. राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते अशातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई करीत १६ गोवंशना जीवनदान दिले.सदर कारवाई
स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, शक्ति कांबळे, मनोज ताले, संदीप काटकर, ढोरेसह आदींनी केली. दरम्यान, आता पर्यत गुन्हे शाखानं शेकडो वर गौवशांना जीवनदान दिले हे प्रशंसनीय आहे. मात्र, शासनानं संपुर्ण राज्यात गोवंश हत्या बंदी लागू केली आहेय. मात्र, या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्यानं अवैध मार्गानं गौवंश वाहतूक होतं आहेय. कत्तलीचं प्रमाण अजूनही सुरुचं असून स्थानिक पोलिस याकडं दुर्लक्ष करीत असल्याचं या कारवाईनंतर दिसतं आहे.