अकोला,दि.२- हवामान विभाग नागपूर यांनी दिलेल्या संदेशानुसार विदर्भातील सर्व जिल्ह्यात दि.२ ते ५ जून पर्यंत अतिवृष्टी, वादळ, गारपीट, वीज कोसळणे इ. नैसर्गिक आपत्तींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, आरोग्य विभागाचे कर्मचारी व अन्य क्षेत्रिय कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी उपस्थित रहावे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.