अकोला,दि.२- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ४९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २७ अहवाल निगेटीव्ह तर २२ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या १३ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित सात जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६२७ झाली आहे. तर आजअखेर १३१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ५४३९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५१६२, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५४१५ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४७८८ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ६२७ आहेत. तर आजअखेर २३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज २२ पॉझिटिव्ह
आज सकाळी प्राप्त अहवालात १२ महिला व १० पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत. दोन महिला रुग्ण ह्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहेत. हे रुग्ण रजपुतपुरा येथील तीन, सिंधी कॅम्प येथिल दोन, माळीपुरा येथील दोन, अशोकनगर अकोट फैल येथील दोन तर उर्वरीत तारफैल, सिटी कोतवाली, जठारपेठ, आंबेडकरनगर, शिवसेना वसाहत, जुने तारफैल, आदर्श कॉलनी, गुलशन कॉलनी, रुद्रनगर, जुनी उमरी नाका, खदान, पुरानी मशिद आणि अलिम चौक खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. आज सायंकाळी एकही अहवाल पॉझिटीव्ह नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.
२० जणांना डिस्चार्ज
आज दुपारून २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात सात महिला व १३ पुरुष आहेत. त्यातील १३ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित सात जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
त्यातील तिन जण रामदास पेठ येथिल, तीन जण अकोट फैल येथील, दोन जण पातूर येथिल, दोन जण सिटी कोतवाली येथील, तर अन्य गोरक्षण रोड, मलकापूर, मोहता मिल, गुलजार पुरा, आगरवेस, फिरदौस कॉलनी, शिवर, रजपुतपुरा, तारफैल, कमलानगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
१३१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ६२७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३४ जण (एक आत्महत्या व ३३ कोरोनामुळे) मयत आहेत. तर आज २० जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ४६२ झाली आहे. तर सद्यस्थितीत १३१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी तीन रुग्ण हे मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत तर एक जण कोविड केअर सेंटरला दाखल आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.