दहीहंडा (कुशल भगत): जागेच्या वादातून युवकाची हत्या केल्याची घटना अकोट तालुक्यातील पळसोद येथे २ जून रोजी दुपारी घडली. किसन पूर्णाजी पाटेकर असे मृतकाचे नाव आहे. दहीहांडा पोलिस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या पळसोद येथील दोन शेजाऱ्यांचा मंगळवारी दुपारी वाद झाला. या वादाचे पर्यावसण हाणामारीत झाले. किसन पाटेकर यांच्या डोक्यावर फावड्याने वार करण्यात आल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळता दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी दहीहांडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.