अकोट (देवानंद खिरकर )- राजस्थान , मध्यप्रदेश कडून आलेले ” टोळ धाडीचे ” संकट महाराष्ट्रातील विदर्भा पर्यंत येऊन पोहचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर येणाऱ्या या संकटाशी लढण्यासाठी कृषी विभागाने पूर्व तयारी करावी तसेच ” कोविड – १९ ” चे संकट असतांना पाकिस्तान मार्गे भारतात प्रवेश झालेले ” टोळ धाडीचे ” संकट अमरावती, नागपूर पर्यंत आलेले आहे. प्रचंड वेगाने धावणारे ” टोळ धाड ” समोर येणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्व पिक फस्त करत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भाजीपाला,केळी व इत्यादी अशी पिके शेतकऱ्यांच्या शेतात आहेत.
पिकांचे नुकसान रोखण्यासाठी पिकांवर कोणते औषध फवारणी करायची या बद्दल मार्गदर्शन करावे. अगोदर आर्थिक संकटात असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत येऊ नये. म्हणून तात्काळ पूर्व तयारी करावी. म्हणजे हे संकट आपल्याला परतून लावता येईल. तरी आपण लवकरात लवकर या येणाऱ्या संकटावर मात करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे ही विनंती.
सदर निवेदन हे मनसे मा.जिल्हा अध्यक्ष रविंद्र फाटे, मनवीसे विभागीय चिटणीस ऍड. श्रीरंग तट्टे यांच्या मार्गदर्शनात आणि मनसे मा.शहर अध्यक्ष नरेश हिरुळकर, मनवीसे शहर अध्यक्ष शशांक कासवे यांच्या नेतृत्वात शुभम देशपांडे, अक्षय रोही, किरण इंगळे, आशिष गवई, शकिर खान व इत्यादी कार्यकर्त्यांनी दिले. सदर माहिती मनवीसे प्रसिद्ध प्रमुख अजय शर्मा यांनी दिली.