पातुर (सुनील गाडगे)- ढाबा सुरळीत चालू ठेवण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करून गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
पातुर बाळापूर रोडवरती भाड्याने घेतलेला भूषणढाबा सुरळीत चालू ठेवण्यासाठी पातुर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने पाच हजार रुपयांची मागणी तक्रारदार याला केली होती त्यावरून तक्रारदार याने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधित विभागाकडे तक्रार केली होती त्यावरून १७ जानेवारी रोजी पडताळणी केली.मात्र आलोसे याला संशय आल्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही.लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने श्रीकांत जायभाये वय ५३ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पातुर पोलीस स्टेशन जी अकोला याला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे
सदर कारवाई श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती पंजाबराव डोंगरदिवे,अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती , गजानन पडघन,पो. उप अधिक्षक ला. प्र.वि.अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पो.नि.संतोष शेगावकर, ना.पो.कॉ.प्रमोद धानोरकर,पो.कॉ.पंकज बोरसे,पो.कॉ. आशिष जांभोळे, चालक- पो.हे.कॉ.चंद्रकांत जनबंधू यांनी केली.











