तेल्हारा : शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते त्यामुळे शहरातील दोन भाग हे सील केले होते. मात्र कोरोनायोद्धा म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर हे या भागातील नागरिकांची तपासणी करण्यास असमर्थता दर्शवित असल्याची तक्रार नगरसेविका आरती गायकवाड यांनी आज तहसीलदार यांच्याकडे केले आहे.
शहरात कोरोना रुग्ण आढळले होते हे रुग्ण ज्या भागात राहत होते अशा भागातील नागरिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन सामान्य जनतेचा साहजिक बदलेला असून कोरोनायोद्धा समजल्या जाणाऱ्या डॉक्टरांचा सुद्धा या भागातील नागरिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याने या परिसरातील नागरिक दवाखान्यात गेले असता मनाई करीत असल्याची तक्रार न प तेल्हारा च्या नगरसेविका आरती गजाजन गायकवाड यांनी तेल्हारा तहसीलदार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील डॉक्टरांना कर्तव्याची जाणीव करून सक्त ताकीद देण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे .यावेळी योग्य ती चॉकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार यांनी निवेदनदेते सांगितले. यावेळी अशोक गव्हाळे, सतीश वाघमोडे,प्रवीण ढोके, शिवा अमृतकार, गजानन गायकवाड निवेदन देते वेळी उपस्थित होते.