अकोला दि.३१- थोर समाजसुधारक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन प्रतिमापूजन करण्यात येऊन अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील निलेश दामोदर, अविनाश डांगे, आशिष काळे. महेंद्र दामोदर, मनोज वावरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
अधिक वाचा : उकळी बाजार येथे युवकांकडून कोरोनाची जनजागृती, जय हनुमान व नेहरू युवा मंडळाच्या युवकाचा उपक्रम