तेल्हारा (प्रतिनिधी)- शहरामधील प्रोफेसर कॉलनीतील स्ट्रीट लाईट अनेक दिवसांपासून बंद असल्याने या भागात अंधाराचे सम्राज्य निर्माण झाले असल्याने चोरट्यांना हि संधी चालून आली असून २९ मे च्या रात्री तसा प्रयत्न चोरट्यानी केल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे.
तेल्हारा पालिकेच्या हद्दीत येत असलेल्या प्रोफेसर कॉलनीतील स्ट्रीट लाईट अनेक दिवसांपासून बंद असल्याने तेथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे हा भाग तेल्हारा हिवरखेड रस्त्याला लागून असल्याने या कॉलनीच्या बाजूला खुली जागा असल्याने साप सारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून भीती आहे तसेच सर्वत्र अंधार असल्याने चोरीच्या घटना सुध्दा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही २९ मे च्या रात्री कोणी तरी अज्ञात व्यक्तीने या प्रोफेसर कॉलनी मधील एका जणाच्या घराची खिळकी उघडुन आत शिरण्याचा प्रयत्न केला असता तेथील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली तरी या कॉलनी मधील स्ट्रीट लाईट नगर पालिकेने लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी प्रोफेसर कॉलनीतील नागरिकांकडून केली जात आहे.तसेच या भागात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे.