अकोट(शिवा मगर )- अकोट येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करीत हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्या इसमाविरुद्ध आज अकोट पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि १७ मे रोजी अकोट पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले ASI राऊत, पो कॉ वरोठे, हे कॉ डामरे हे कर्तव्यावर असतांना धारूडिवेस पोलीस चौकीसमोर आरडा ओरड करून शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी आरोपी ताज शरीफ राणा हा सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ मध्ये दिसत आहे.यामध्ये चॉकशी केली असता लॉक डाऊन असल्यामुळे लोकांना रस्त्यावर फिरू नका असे सांगत घरी जा असे सांगत असतांना आरोपीने शिवीगाळ करीत हातपाय तोडण्याची धमकी सदर पोलिसांना दिली तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे लोक जमा करून उल्लंघन केल्यावरून आरोपी ताज शरीफ राणा रा कांगरपूरा याच्या विरुद्ध कलम २६९,२९४,५०६,१८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.