• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना: नागरिकांना लाभ देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी- विभागीय आयुक्त पियुष सिंह

Team by Team
May 29, 2020
in अकोला, Featured, विदर्भ
Reading Time: 2 mins read
82 1
0
Mahatma Janaarogya Yojna
15
SHARES
591
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दिनांक २९- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोवीड व्यतिरिक्त अन्य आजारांवरील अत्यावश्यक उपचारांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना अंगीकृत रुग्णालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे, नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज येथे दिले. या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात १३ खाजगी रुग्णालये संलग्नित आहेत.

राज्य शासनाने ज्योतिबा फुले जन आरोग्य ही योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी संलग्नित करून एकत्रितरित्या १ एप्रिल २०२० पासून अंमलात आणली आहे. त्यामुळे या योजनेची व्याप्ती वाढून सुमारे ९० टक्के नागरिकांचा लाभार्थी म्हणून समावेश झाला आहे. उर्वरीत नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, तसेच सद्यस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे अंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील रहिवासी असलेल्या नागरिकांनाही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या उपचार सुविधा मान्यताप्राप्त दराने सर्व अंगिकृत रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या कोरोना उपचारांमुळे शासकीय रुग्णालयांवर सेवा देण्यात मर्यादा असल्या तरी जे जे अंगिकृत रुग्णालये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत संलग्नित आहेत तेथे नॉन कोवीड आजारांवरील उपचार सुविधा विनामुल्य उपलब्ध आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत ९९६ व आयुषमान भारत योजने अंतर्गत १२०९ आजरांवर उपचार समाविष्ठ आहेत. आतापर्यंत शासकीय रुग्णालयाकरिता राखीव असलेल्या १३४ उपचारापैकी १२० उपचार खासगी रुग्णालयांना ३१ जुलै २०२० पर्यंत मान्यताप्राप्त दराने उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच काही किरकोळ, मोठे उपचार आणि तपासण्या ज्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत, त्या उपचार आणि तपासण्या या योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये वैद्यकीय प्राधिकरणाच्या दरानुसार उपलब्ध करून देण्यात आले आहे. या खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित रुग्णालयास राज्य शासनाद्वारे राज्य आरोग्य सोसायटी, वरळी मुंबई यांच्यामार्फत करण्यात येते. याबाबत प्रत्यक्ष शासनाने ठरविलेल्या दरानुसार निधी देण्यात येईल. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत या प्रक्रियेवर नियंत्रण केले जाईल. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनी योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात अवघाते हॉस्पिटल, के.एस. पाटील हॉस्पिटल, माऊली मॅटर्निटी ॲण्ड सर्जिकल सुपरस्पेशालिटी, मोराक्का हॉस्पिटल, संत तुकाराम हॉस्पिटल ॲण्ड मेडीकल रिसर्च सेंटर, श्रीमती चांडक रिसर्च फाऊंडेशन ट्रस्ट्चे हॉस्पिटल, विठ्ठल हॉस्पिटल, रिलायन्स हॉस्पिटल, न्यू ग्लोबल हॉस्पिटल, चिल्ड्रन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, बबन हॉस्पिटल, मेहर ऑर्थोपेडीक या खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अंगिकृत हॉस्पिटलला जाऊन योजनेच्या आरोग्य मित्रास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या योजनेच्या नियंत्रणासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात राज्य आरोग्य हमी सोसायटी, जिल्हा समन्वय अधिकारी यांचा कक्षही कार्यान्वित आहे.

 

विभागातील जिल्ह्यानिहाय रुग्णालयांची यादी:
 अकोला
१) अवघाते बाल रुग्णालय, मूर्तिजापूर
२) बाबन मल्टिस्पेशालिटी रुग्णालय,मूर्तिजापूर
३) सिटी हॉस्पिटल अकोला
४) जिल्हा स्त्री रुग्णालय
५) डॉ. के.एस. पाटील रुग्णालय अकोला
६) शासकीय वैधकीय महाविद्यालय अकोला
७) मेहेर ऑर्थोपेडिक रुग्णालय मूर्तिजापूर
८) मुरारका ऑर्थोपेडिक हॉस्पिटल अकोला
९) माउली मॅटर्निटी अँड सुपरस्पेसिलिटी रुग्णालय अकोला
१०) न्यू ग्लोबल हॉस्पिटल अकोला
११) ग्रामीण रुग्णालय अकोट
१२) रिलायन्स हॉस्पिटल अकोला
१३) उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर
१४) संत तुकाराम हॉस्पिटल अकोला
१५) बी. एल. चांडक बंसती डायलीसीस सेंटर अकोला
१६) विठ्ठल हॉस्पिटल, अकोला
*अमरावती*
१) उपजिल्हा रुग्णायल दर्यापूर अमरावती
२) आरोग्यम इन्स्टिटयूट मेडिकल सायन्सेस अमरावती
३) भन्साली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल परतवाडा
४) सिटी हॉस्पिटल अमरावती
५) डॉ .बारब्दे हॉस्पिटल अमरावती
६) देशमुख आय हॉस्पिटल अमरावती
७) जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती
८) डॉ.पंजाबराव देशमुख हॉस्पिटल अँड कॉलेज अमरावती
९) सुशीला नायर हॉस्पिटल धरणी
१०) जिल्हा रुग्णालय अमरावती
११) हाय टेक हॉस्पिटल अमरावती
१२) मातृछाया हॉस्पिटल अमरावती
१३) ग्रामीण रुग्णालय वरुड
१४) सुपर स्पेशिअलिटी हॉस्पिटल अमरावती
१५) उपजिल्हा रुग्णालय अचलपूर
१६) उपजिल्हा रुग्णालय मोर्शी
१७) संकल्प डायलिसिस सेंटर अमरावती
१८) श्री संत अच्युत महाराज रुग्णालय
बुलढाणा
१) अंकुर बाल रुग्णालय चिखली
२) आस्था ऍक्सिडंट हॉस्पिटल मलकापूर
३) अमृत हृदयालय बुलढाणा
४) चोपडे हॉस्पिटल मलकापूर
५) सिटी हॉस्पिल बुलढाणा
६) जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती
७) सामांन्य रुग्णालय खामगाव
८) कोठारी रुग्णालय चिखली
९) कोलते रुग्णालय मलकापूर
१०) मानस हॉस्पिटल मलकापूर
११) माउली डायलिसिस शेगाव
१२) मेहेत्रे हॉस्पिटल बुलढाणा
१३) मेहकर मल्टीस्पेशालिटी मेहकर
१४) राठोड मल्टीस्पेशालिटी मेहकर
१५) ग्रामीण रुग्णालय देऊळगाव
१६) ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा
१७) संचेती हृदयालय
१८) उपजिल्हा रुग्णालय मलकापूर
१९) सोनटक्के रुग्णालय खामगाव
२०) साई बाई मोठे उपजिल्हा रुग्णालय खामगाव
२१) सिल्व्हसिटी रुग्णालय हॉस्पिटल खामगाव
२२) तिरुपती  हॉस्पिटल देऊळगाव राजा
२३) तुळजाई हॉस्पिटल चिखली
वाशीम
१) बाजड हॉस्पिटल वाशीम
२) बिबेकर हॉस्पिटल वाशीम
३) डॉ .वोरा हॉस्पिटल वाशीम
४) देवळे हॉस्पिटल वाशीम
५) जिल्हा  रुग्णालय वाशीम
६) बालाजी बाळ रुग्णालय वाशीम
७) कानडे बाळ रुग्णालय
८) लाईफ लाईन हॉस्पिटल वाशीम
९) लोटस हॉस्पिटल वाशीम
१०) माँ गंगा हॉस्पिटल वाशीम
११) ग्रामीण रुग्णालय  मंगरुळपीर
१२) उपजिल्हारुग्णालय कारंजा
१३) वाशीम क्रिटिकल केअर
यवतमाळ
१) भांगडे हॉस्पिटल पुसद
२) चिंतामणी हॉस्पिटल यवतमाळ
३) चव्हाण हॉस्पिटल पुसद
४) कॉटन सिटी हॉस्पिटल यवतमाळ
५) लाईफ लाईन हॉस्पिटल पुसद
६) मेडी केअर हॉस्पटिल पुसद
७) पोटे हॉस्पिटल यवतमाळ
८) ग्रामीण रुग्णालय दिग्रस
९) ग्रामीण रुग्णालय वणी
१०) साई श्रद्धा रुग्णालय यवतमाळ
११) उपजिल्हा रुग्णालय दारवा
१२) उपजिल्हा रुग्णालय पुसद
१३) उपजिल्हा रुग्नालय पांढरकवडा
१४) शांती  ऑर्थोपेडिक हॉस्पिटल यवतमाळ
१५) संजीवनी हॉस्पिटल यवतमाळ
१६) संत श्री रामराव महाराज आरोग्यम हॉस्पिटल दिग्रस
१७) सेवा हॉस्पिटल यवतमाळ
१८) शाह हॉस्पिटल यवतमाळ
१९) श्री दत्त हॉस्पिटल यवतमाळ
२०) श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ
Tags: अकोलाआयुक्त पियुष सिंहप्रधानमंत्री जन आरोग्यमहात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना
Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेल्हाऱ्यात ५१ जणांनी केले रक्तदान

Next Post

२७६ अहवाल प्राप्तः ४२ पॉझिटीव्ह, ३९ डिस्चार्ज

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
corona

२७६ अहवाल प्राप्तः ४२ पॉझिटीव्ह, ३९ डिस्चार्ज

telhara-29-may-news-2

माणुसकी हरवली....खांदा द्यायला कोणी नसल्याने अंत्यसंस्काररासाठी हातगाडीवरून नेला मृतदेह, कोठे झाला हा प्रकार वाचा सविस्तर...

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.