तेल्हारा(प्रतिनिधी)- आज प्रहार जनशक्ति पक्ष व गोपीनाथ नवदुर्गा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
अकोल्याचे पालकमंत्री मा. बच्चुभाऊ कडू यांच्या आरोग्य सेवेचा वसा व तुषार दादा पुंडकर यांचे विचार हे मनी धरून व आता आलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रहार व मंडळ सदस्य यांनी हे रक्तदान आयोजित केले व याला भरपूर प्रतिसाद मिळाला ५१ जणांनी रक्तदान देऊन रक्तदात्यांनी संधीचा लाभ घेतला प्रहार कडून त्यांना सेनिटायझर बॉटल प्रमानपत्र मास्क देऊन गौरव करण्यात आला. या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून तेल्हारा तहसीलदार सुरडकर साहेब गटविकास अधिकारी चव्हाण साहेब ठाणेदार देवरे , मुख्यका नगर परिषद श्री अकोटकर साहेब डाँ तापडिया साहेब डॉ राठी साहेब डॉ सोनल सोनी डॉ पंकज राठी व प्रहार सेवक मा. श्री सुशील दादा पुंडकर ,विक्की भाऊ मल्ल , मुकेश बिहाडे, प्रफुल दबडघाव, वैभव खाडे, प्रदीप पाथरीकर भैया देशमुख, प्रमोद तायडे, शैलेश नायकवाडे, सागर एखंडे, सुनील जाधव,अजय बग्गान विजय बग्गान विक्की मंगळे, प्रतीक पाथरीकर प्रफुल पाथरीकर आशिष उमाळे नराजे काका गणेश आमले मोहन भाऊ सोनि विष्णू मल्ल रितेश मल्ल यश शर्मा विक्की माथारिया सुरज मुरारका मनीष गवळी लखन शर्मा मुकेश बग्गान गोपाळ तीवर गोपाल पालीवाल चेतन पाडिया यांचा सहभाग लाभला जनतेने जास्तीत जास्त रक्तदान करूण सहकार्य केले