तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला असून क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन कामाला लागले आहे.
शहरातील इंदिरा नगर येथील एक व बेलखेड येथील एक असे दोन पॉझिटिव्ह निघाल्याने प्रशासन हादरले असून प्रशासनांकडून कोरोनाबाधित भागातील लोकांचे सर्वेक्षण करून माहिती गोळा करणे सुरू केले असून एरिया सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सदर कोरोनाबधित हे खापरखेड येथील विपश्यना केंद्रात क्वारंनटाईन करण्यात आले होते त्यांचे swab चे नमुने पाठवण्यात आले होते त्यांचा आज अहवाल पॉझिटिव्ह आला