• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 17, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

संपर्क शोधाचा कालावधी कमीत कमी करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

Team by Team
May 29, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
81 0
0
bacchu kadu meeting
13
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दिनांक २८- अकोला जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सुसूत्रपद्धतीने उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तिंचा शोध घेण्याचा कालावधी हा कमीत कमी करावा, निकट संपर्कातील व्यक्तिंना क्वारंटाईन करावे तसेच उच्च धोका व कमी धोका असणाऱ्या व्यक्तींनाही अलग अलग ठेवावे असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी आज तातडीने जिल्ह्याला भेट दिली. यासंदर्भात आज सकाळी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. श्यामसुंदर शिरसाम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यावेळी मनपा आयुक्त संजय कापडणीस, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांनी पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांच्या तपासण्या व अन्य प्रक्रियांबाबत तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील बंदोबस्त उपाययोजनांबाबत माहिती दिली. त्यावर ना. कडू यांनी निर्देश दिले की, जेथे जेथे रेड झोन असतील तेथे आणखी दाट वस्ती असलेला भाग मार्क करा. तसेच पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोकांना एका तासाच्या आत क्वारंटाईन करा. तसेच संपर्क शोधाचा कालावधी कमी करा. जोखमीच्या स्तरानुसार सुद्धा रुग्ण वेगवेगळे ठेवा असे निर्देश दिले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच कोविड केअर सेंटर तयार केलेल्या ठिकाणाच्या आतील व्यवस्थांवर व्हिडीओ निरीक्षण ठेवा. तसेच अति संवेदनशील भागात ड्रोनचा वापर करुन निरीक्षण ठेवता येईल, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी कोरोना श्रृंखला तोडण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याबद्दल चर्चा करण्यात आली.

Tags: अकोलाउपजिल्हाधिकारी संजय खडसेपालकमंत्री ना.बच्चू कडू
Previous Post

कोरोनाची श्रृंखला तोडण्यासाठी एकजुट महत्त्वाची सर्वपक्षीय बैठकीत पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे प्रतिपादन

Next Post

२०१ अहवाल प्राप्तः नऊ पॉझिटीव्ह, ३४ डिस्चार्ज, एक मयत

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
corona

२०१ अहवाल प्राप्तः नऊ पॉझिटीव्ह, ३४ डिस्चार्ज, एक मयत

review meeting_anil deshmukh

गृह मंत्र्यांकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा; ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी- गृह मंत्री अनिल देशमुख

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.