• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोल्याच्या नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करावे- केंद्रीय राज्यमंत्री ना. धोत्रे

दिल्लीहून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाप्रशासनाचा आढावा

Team by Team
May 29, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
dhotre
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२८- जिल्ह्यात कोविड बाधीत रूग्णांच्या संख्येतील वाढ लक्षात घेता नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय मानव संसाधन विकास , दुरसंचार , इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी केले.

केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी आज दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा प्रशासनाशी संवाद साधला. यावेळी महापौर अर्चना मसने, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची उपस्थिती होती.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यावेळी राज्यमंत्री ना. धोत्रे यांनी जिल्हा प्रशासनास सुचना केल्या की, रुग्ण संख्या जादा असलेल्या भागात लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात यावे, प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरीकांसाठी दुध व भाजीपाला तसेच मेडिकल सारख्या जीवनावश्यक वस्तुंचा सुरळीत राहिल अशी व्यवस्था ठेवावी. आवश्यकता भासल्यास खाजगी डॉक्टर्स व स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असे निर्देश दिले.

अकोला येथे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता परिस्थितीनुसार नागरिकांनी घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे. ग्रामीण भागात इतर राज्य व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत अलगीकरण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड संसर्गित रूग्णांना चांगली उपचार व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक कर्मचारी अधिकारी तसेच नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे असे आवाहनही राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी केले.

Tags: अकोलाआयुक्त संजय कापडणीसउपजिल्हाधिकारी संजय खडसेकेंद्रीय राज्यमंत्री ना. धोत्रे
Previous Post

आज अकोला दिवसभरात प्राप्त अहवाल-२०१, पॉझिटीव्ह-नऊ, निगेटीव्ह-१९२

Next Post

कोरोनाची श्रृंखला तोडण्यासाठी एकजुट महत्त्वाची सर्वपक्षीय बैठकीत पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे प्रतिपादन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
meeting with bachu kadu

कोरोनाची श्रृंखला तोडण्यासाठी एकजुट महत्त्वाची सर्वपक्षीय बैठकीत पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे प्रतिपादन

bacchu kadu meeting

संपर्क शोधाचा कालावधी कमीत कमी करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.