• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्हाधिकारी पापळकर यांनी घेतली तातडीची आढावा बैठक

Team by Team
May 28, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
81 1
0
Jitendra Papalkar
13
SHARES
586
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दिनांक २७ – जिल्ह्यातील वाढत्या रुग्ण संख्येबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज सायंकाळी उशीरा तातडीने आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. त्यात आज (गुरुवार दि.२८)पासून शहरात सुरु होणाऱ्या आरोग्य सर्वेक्षणात आढळणारे उच्च धोका पातळीतील तसेच संदिग्ध वाटणारे रुग्णांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे,डॉ. अष्टपुत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अकोला शहरात मनपा हद्दीत आरोग्य तपासणी मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या तपासणीत जे व्यक्ती संदिग्ध वा उच्च धोकापातळीत आढळतील त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात असलेल्या संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात येईल. त्यासाठी तेथील ६५० बेडच्या क्षमतेचा वापर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले. या व्यक्तिंना तेथेच निरीक्षणात ठेवून जर लक्षणे आढळली तर तेथेच व्यवस्था करुन त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासले जातील. जर नमुन्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणले जाईल. आणि अहवाल निगेटीव्ह आल्यास त्या व्यक्तीस घरी गृह अलगीकरणात ठेवण्यात येईल. ही संस्थागत अलगीकरणाची व्यवस्था डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या वसतीगृह व अन्य इमारतींमध्ये सद्यस्थितीत आहेच. सध्या तेथे ६५० बेडची व्यवस्था आहे, या क्षमतेचा वापर करुन ही उपाययोजना राबवावी, तसेच आज ( गुरुवार दि.२८) पासून मनपा हद्दीत प्रत्येक घरी प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात येईल. त्याची सुरुवात प्रतिबंधित क्षेत्रांपासून करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. सध्या भरतीया रुग्णालयात सुरु असलेले घशातील स्त्रावांचे नमुना संकलन केंद्र हे संस्थागत अलगीकरणाच्या ठिकाणी म्हणजेच पीकेव्ही येथे स्थलांतरीत करावे, असेही निर्देश देण्यात आले.

भरतीया रुग्णालयातील नमुने संकलन केंद्राचे पीकेव्हीत स्थलांतर

दरम्यान पीकेव्हीत संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात येणाऱ्या संदिग्ध वा जोखमीच्या व्यक्तींचे घशातील स्त्रावांचे कोरोना विषाणू चाचणी करिता संकलन करता यावे यासाठी भरतीया रुग्णालयात सुरु केलेले स्त्राव नमुना संकलन केंद्र आता पीकेव्हीत स्थलांतरीत करण्यात येऊन तेथे कार्यान्वित करण्यात येत आहे, ही कारवाई उद्याच पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.

Tags: अकोलाउपजिल्हाधिकारी संजय खडसेजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरडॉ. राजकुमार चव्हाण
Previous Post

आज अकोल्यात एकच रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने दिलासा मात्र आकडा ५०८ पार

Next Post

मदतीसाठी सोनू सूदने दिला टोल फ्री नंबर, आपल्या घरी जाणा-या मजुरांना विनंती करत म्हणाला – ‘जाणाऱ्यानो, परत नक्की या’

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
sonu sood

मदतीसाठी सोनू सूदने दिला टोल फ्री नंबर, आपल्या घरी जाणा-या मजुरांना विनंती करत म्हणाला - ‘जाणाऱ्यानो, परत नक्की या’

prakash ambedkar

वंचित बहूजन आघाडीचे वतीने पालकमंत्री व जिल्हाधिकारी ह्यांना कोरोना संदर्भात निवेदन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.