तेल्हारा (प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजविला असून तेल्हारा शहरात कोरोनाने शिरकाव केला अशात प्रतिबंधित क्षेत्रातील शौचालयाची दुरावस्था झाल्याने प्रशासनाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील नागरिक उघड्यावर शौचास जात आहेत.त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे अशातच तेल्हारा शहरात सुद्धा कोरोनाचे पॉझिटिव्ह मिळाल्याने ज्या भागात हे रुग्ण आढळले तो भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे.या प्रतिबंधीत भागामध्ये न प प्रशासनाचे सार्वजनिक शौचालय असून त्याचा काहीही एक उपयोग या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना होतांना दिसत नाही स्वच्छ भारत अभियानामार्फत शौचा लयाची रंगरंगोटी करून पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या मात्र त्यामध्ये पाणी नाही,नळ बसवले तर त्याला तोट्या नाहीत,लाईट बसवले तर लाईन कनेक्शन नाही मग या शौचालयाचा उपयोग काय असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत.प्रतिबंधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग असल्याने अनेकांच्या घरी शौचालय नाही त्यामुळे बाहेर उघड्यावर शौचास बसतात त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे.या कोरोनाच्या काळात तरी न प प्रशासनाने शौचालयाची दुरावस्था सुधारावी जेणेकरून प्रतिबंधित एरिया मधील नागरिक उघड्यावर शौचास जाणार नाहीत.