अकोला,दि.२६ – आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ३१५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २९५ अहवाल निगेटीव्ह तर २० अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर ३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या दोघांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित ३६ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ४३५ झाली आहे. तर आजअखेर प्रत्यक्षात ११८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ४३५० जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४०९८, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४२ नमुने होते. आजपर्यंत एकूण ४२९९ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४०४७ तर फेरतपासणीचे ११० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३८६४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ४३५ आहेत. तर आजअखेर ५१ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज २० पॉझिटिव्ह
आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या १३ रुग्णांपैकी दहा पुरुष व तीन महिला आहेत. या रुग्णांपैकी तीन जण मलकापूर, तीन जण सिंधी कॅम्प येथील तर उर्वरित प्रत्येकी नवाबपुरा, अकोट फैल, बाळापूर रोड, शिवाजी पार्क, राऊतवाडी, सतरंजपूरा बाळापूर, पिंजर ता. बार्शी टाकळी, येथील रहिवासी आहेत.
तर आज सायंकाळी दाखल सात जणांपैकी सर्व पुरुष आहेत. त्यातील पाच जण हे हरिहर पेठ अकोला येथील रहिवासी आहेत तर उर्वरित दोघे जण आंबेडकरनगर अकोट फैल व सबेरी मशिद अकोट फैल येथील रहिवासी आहेत. यात आज पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या एका मयत रुग्णाचा समावेश आहे.
तिघांचा मृत्यू
दरम्यान काल (दि.२५) रात्री एका ५६ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बाळापूर येथील रहिवासी होता. तो दि.२२ रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल कालच पॉझिटिव्ह आला. त्याचा उपचार सुरु असतांना काल मृत्यू झाला. आज सायंकाळी प्राप्त अहवालात दोन पुरुष रुग्ण मयत झाले आहेत. त्यातील एक सबेरी मशिद अकोट फैल येथील रहिवासी आहे. हा ७१ वर्षीय रुग्ण दि.२३ रोजी दाखल झाला होता. त्याचा मृत्यू दि.२४ रोजी झाला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे. तर अन्य रुग्ण हा ६६ वर्षीय आगरवेस जुनेशहर येथील रहिवासी आहे. हा रुग्ण दि.१८ रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल दि.२२ रोजी आला होता. तर आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास उपचार घेतांना त्याचे निधन झाले.
३८ जणांना डिस्चार्ज
तर आज दुपारी ३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील ३६ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले तर उर्वरित दोघांना घरी सोडण्यात आले. यात १७ महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण डाबकी रोड येथील चार, खदान येथील तीन, मलकापूर दोन, फिरदौस कॉलनी दोन, सोनटक्के प्लॉट दोन, न्यु तारफैल सहा, तेल्हारा दोन, जोगळेकर प्लॉट डाबकी रोड दोन, तर जुने शहर, लकडगंज, रामदास पेठ, चांदखां प्लॉट, दसेरा नगर, देशमुख फैल, सिव्हील लाईन, भिमनगर अकोट फैल , अडगाव, नायगाव, मोमीनपुरा, आगरवेस, अकोट फैल हाजीनगर, मोहम्मद अली रोड, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत.
११८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ४३५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २८ जण (एक आत्महत्या व २७ कोरोनामुळे) मयत आहेत. तर आज ३८ जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या २८९ झाली आहे. तर सद्यस्थितीत ११८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर ४१०६ प्रवासी आले आहेत. त्यापैकी २२५७ गृहअलगीकरणात तर १४४ जण संस्थागत अलगीकरणात असे २४०१ जण अलगीकरणात आहेत. तर १५५६ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १५५ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.