अकोला दिनांक २५- खरीप हंगाम २०२० चा विभागीय जिल्हा आढावा बुधवार दि.२७ रोजी होणार आहे. या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे हे राहणार आहेत.
बुधवार दि.२७ रोजी सकाळी साडेआठ वाजता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ते आढावा घेतील. या आढावा बैठकीत ना. भुसे हे अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. ही बैठक संपल्यावर सकाळी १० वाजता ते औरंगाबादकडे रवाना होणार आहेत.