अकोट (देवानंद खिरकर ): अकोट तालुक्यातील शेतकऱ्याने अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देत उभे केलेल पिक कोरोणाच्या महामारी मुळे अडचणीत आल होत. परंतू अकोट तालुक्यातील बोर्डी,नागापूर शेत शिवारातील ऊस उत्पादक शेतकरी श्याम बोरोकार यांनी कोरोना मुळे रसवंती बंद पडल्या त्यामुळे त्यांनी शेतातच गुळ तयार करण्यास प्रारंभ केला. त्यांनी तीन एकर रसवंतीसाठी ऊस लागवड केली होती. यावर्षी रसवंतीचा हंगाम सुरू होण्याच्या आधीच कोरोणाचा प्रवेश महाराष्ट्रात झाला रसवंतीसाठी ऊस आता कामी येणार नाही व शेतातच उभा राहणार हे या तरुण शेतकऱ्यांना स्वस्थ बसू देत नव्हते श्याम बोरोकार यांनी शेतातील उसाचे गाळप करून गूळ तयार करण्याचा निश्चय करून गुळाची निर्मिती सुरू केली.
यामध्ये काटसावर, भेंडीच्या झाडाची साल, गाईचे दूध, जायफळ, विलायची, याचा उपयोग करीत सेंद्रिय गुळाची निर्मिती केली गुळाची चव स्वादिष्ट व पौष्टिक असल्याने त्याची मागणी सुध्दा वाढली. कोरोणाच्या महामारी मुळे शेतकऱ्यांना अनेक संधी उपलब्ध झाल्यात व पुढेही निर्माण होणार आहेत उत्पादन आणि उत्पन्न यातील ताळमेळ ठेवत शेती करणे हे सध्याच्या काळात आव्हान आहे.पण यावर मात करण्यासाठी गरज आहे ती जिद्द,चिकाटी व अतिरिक्त परिश्रम करण्याची व आपली शेती माती व प्रपंच आत्मनिर्भर करण्याची शेतीच्या कच्च्या मालावर स्वतः शेतकऱ्यांनी प्रक्रिया करावी उत्पादनाचे ब्राँण्डींग करून थेट शेतकरी ते ग्राहक असे मार्केटिंग स्वतःकेल व आपले उत्पन्न वाढविले.