अकोला,दि.२४ – आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १८५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १६६ अहवाल निगेटीव्ह तर १९ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. काल (दि.२३) रोजी रात्री आणखी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या सर्व जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर काल रात्रीच एका ६० वर्षीय महिलेचा उपचार घेतांना मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ३९७ झाली आहे. तर आजअखेर प्रत्यक्षात १४४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३८२१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३५७३, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३९ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३७०७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३४५९ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३९ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३३१० आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ३९७ आहेत. तर आजअखेर ११४ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
एका महिलेचा मृत्यू
काल (दि.२३)रात्री एका ६० वर्षीय महिला रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाला. ही महिला माळीपूरा येथील रहिवासी होती, दि.२० रोजी दाखल झाली होती.
आज १९ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात १८५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १९ अहवाल पॉझिटीव्ह आलेत तर १६६ निगेटीव्ह. आज सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या नऊ रुग्णांत चार महिला व पाच पुरुष आहेत. त्यातील पाच जण तेल्हारा येथील आहेत. तर उर्वरित राऊतवाडी, राजीव गांधी नगर, साईनगर डाबकी रोड, श्रावगी प्लॉट येथील रहिवासी आहेत. तेल्हारा येथिल रुग्ण हे मुंबईहून आलेले असून ते अकोला येथील गितानगर मधील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते.
तर, आज सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या दहा रुग्णांपैकी सात पुरुष व तीन महिला आहेत. त्यातील एक महिला ही जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहे. या रुग्णांपैकी सात जण हे न्यु तारफैल येथील रहिवासी आहेत. तर अन्य शासकीय गोदाम सिंधी कॅम्प, अशोक नगर, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत.
१० जणांना डिस्चार्ज
काल (दि.२३) रात्री दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते सर्व पुरुष आहेत.या सगळ्यांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले असून त्यात दोघे फिरदौस कॉलनी येथील तर अन्य आळशी प्लॉट, अकोट फ़ैल, खैर मोहम्मद प्लॉट, नानक नगर, इमानदार प्लॉट, समता नगर, मोमीनपुरा, रणपिसेनगर येथील रहिवासी आहेत.
१४४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ३९७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २४ जण (एक आत्महत्या व २३ कोरोनामुळे) मयत आहेत. तर काल(दि.२३) रात्री दहा जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता एकूण व्यक्तींची संख्या २२९ झाली आहे. तर सद्यस्थितीत १४४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर ३६७१ प्रवासी आले आहेत. त्यापैकी २१३० गृहअलगीकरणात तर १३० जण संस्थागत अलगीकरणात असे २२६० जण अलगीकरणात आहेत. तर १२७० जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १४१ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.