तेल्हारा (प्रतिनिधी )- गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना या संसर्गजन्य रोगाने आपली दहशत कायम ठेवत अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून कोरोना बाधितांचा आकडा हा चारशेच्या जवळपास गेला आहे सातपुड्याच्या पायथ्याला आजपर्यंत भेदू न शकणारा कोरोनाने अखेर सातपुड्याच्या पायथ्याशी एन्ट्री केल्याने कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. यामध्ये तेल्हारा तालुक्यातील पाच जनांचा अहवाल हा पॉझीटीव्ह आल्याने संपूर्ण परिसर सीलबंद करण्यात आला आहे.
देशात कोरोनाने एन्ट्री केल्यापासून तेल्हारा तालुका आजपर्यंत अबाधित होता मात्र मुंबई येथून आलेल्या प्रवाशांमुळे कोरोनाबाधित झाला.काल सायंकाळी आलेल्या माहिती नुसार तालुका प्रशासन रात्रीलाच कामाला लागून रुग्ण ज्या एरिया मध्ये राहत होते तो संपूर्ण एरिया सील बंद करण्यास सुरुवात केली .आज सकाळी जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार तेल्हारा तालुक्यातील पाच रुग्ण हे पोझीटिव्ह आहेत.
यामध्ये शहरातील चार तर बेलखेड येथील एक असे पाच रुग्ण हे पॉझीटीव्ह असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र प्रशासनाला रात्रीच याबाबत माहिती पडल्याने सदर रुग्णांना खापरखेड येथील विपश्यना केंद्रामध्ये विलगीकरण कक्षात ठेवलेले होते सदर रुग्णांना रात्रीच अकोला येथे हलवण्यात आले. आज सकाळी तालुका प्रशासन व नगर पालिका पोलीस प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रात मध्ये जाऊन निरीक्षण केले. यावेळी प्रतिबंधित एरिया मध्ये न प कडून फवारणी केली. तेल्हारा शहरासह बेलखेड येथील संपूर्ण एरिया हा सीलबंद केला असून नागरिकांनी सुधा पुढाकार घेऊन स्वत एरिया बंदी केली. यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे यांनी संपूर्ण शहरामध्ये चोख बंदोबस्त ठेवला असून घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तर पोझीटीव्ह रुग्ण आढळल्याने तेल्हारा शहर हे तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.यावेळी नागरिक प्रशासनाला सहकार्य करीत आहेत हे येथे उल्लेखनीय आहे. यावेळी न प प्रशासनाकडून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.