• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

१५३ अहवाल प्राप्तः २३ पॉझिटीव्ह, १३ डिस्चार्ज

Team by Team
May 23, 2020
in अकोला, Corona Featured, Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
corona
12
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२३ – आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १५३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १३० अहवाल निगेटीव्ह तर २३ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. काल (दि.२२) व आज (दि.२३) मिळून आणखी १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना घरी पाठवण्यात आले आहे तर उर्वरित सहा जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ३७८ झाली आहे. तर आजअखेर प्रत्यक्षात १३६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण ३६३९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ३५२२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ३१४४ अहवाल निगेटीव्ह तर ३७८ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ११७ अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

आजपर्यंत एकूण ३६३९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३३९१, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३९ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३५२२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३२७४ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३९ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३१४४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ३७८ आहेत. तर आजअखेर ११७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज २३ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात १५३ अहवाल प्राप्त झाले त्यात २३ अहवाल पॉझिटीव्ह तर १३० निगेटीव्ह आले. आज सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या सात रुग्णांपैकी सहा महिला व एक पुरुष असून त्यात पाच जण फिरदौस कॉलनी येथील रहिवासी असून उर्वरित एक माणिक टॉकीज जवळ टिळकरोड तर अन्य लोहिया नगर खोलेश्वर येथील रहिवासी आहे. तर आज सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या १६ रुग्णांपैकी नऊ महिला व सात पुरुष असून त्यात दोनजण फिरदोस कॉलनी, दोन जण लोहिया नगर खोलेश्वर येथील रहिवासी आहे. तर उर्वरित माळीपुरा, मोहम्मद अली रोड, नानकनगर निमवाडी, चांदखा प्लॉट वाशीम बायपास, गोरक्षण रोड मलकापूर, यमुना संकुल, श्रावगी प्लॉट, हरिहर पेठ, इकबाल कॉलनी मोहता मिल जवळ, मलकापूर, रेल्वे झोन रामदास पेठ, दसेरा नगर हरिहर पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

१३ जणांना डिस्चार्ज

तसेच काल (दि.२२) रात्री पाच जणांना तर आज (दि.२३) आठ जणांना असा १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सहा जण कोवीड केअर सेंटरला निरीक्षणात आहेत. तर सात जणांना घरी सोडण्यात आले आहे. काल (दि.२२) रात्री पाच जणांना डिस्चार्ज देण्यात त्यातील दोघे खैर मोहम्मद प्लॉट येथील तर अन्य फिरदौस कॉलनी, आगर वेस व अकोट फैल येथील रहिवासी आहेत. या पाचही जणांना घरी सोडण्यात आले आहे.

आज (दि.२३) दुपारुन आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आठही महिला आहेत. त्यातील दोघींना घरी सोडण्यात आले आहे. त्या दोघी फिरदौस कॉलनी व सुभाष चौक येथील रहिवासी आहेत. तर अन्य सहा महिलांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले असून त्यात दोघी जणी फिरदौस कॉलनी येथील तर अन्य रेवतीनगर, सुभाष चौक, माणिक टॉकीज जवळ, लोहिया नगर येथील रहिवासी आहेत.

१३६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत ३७८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २३ जण (एक आत्महत्या व २२ कोरोनामुळे) मयत आहेत. काल शुक्रवार दि.२२ रोजी रात्री पाच तर आज (दि.२३) आठ जणांना असा १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या २१९ झाली आहे. तर सद्यस्थितीत १३६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान आजअखेर ३४२० प्रवासी आले आहेत. त्यापैकी १९४८ गृहअलगीकरणात तर १३९ जण संस्थागत अलगीकरणात असे २०८७ जण अलगीकरणात आहेत. तर १२०० जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १३३ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Tags: अकोलाकोरोनाकोविड १९
Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश :अपर जिल्हाधिकारी लोणकर यांच्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासक पदाचा कार्यभार

Next Post

पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार कार्यवाही: कापूस, तूर, हरभरा पिकाच्या शिल्लक साठा दोन दिवसांत नोंदविण्याचे आदेश

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
soyabean-cotton-crops

पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार कार्यवाही: कापूस, तूर, हरभरा पिकाच्या शिल्लक साठा दोन दिवसांत नोंदविण्याचे आदेश

PKV

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचा उपक्रम मंगळवारी (दि.२६) राज्यस्तरीय ऑनलाईन कापूस कार्यशाळा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.