अकोला: जिल्हा माहिती कार्यालय,अकोला
कोरोना अलर्ट
आज शुक्रवार दि.२२ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-९२
पॉझिटीव्ह-आठ
निगेटीव्ह-८४
अतिरिक्त माहिती
दोन रुग्ण मयत झाले आहेत. हे दोन्ही रुग्ण हे मंगळवार दि.१९ रोजी दाखल झाले होते. ते त्याच दिवशी मयत झाले. त्यांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील एक रुग्ण ५० वर्षीय महिला असून ती नायगाव येथील रहिवासी आहे. तर अन्य एक ५२ वर्षीय पुरुष असून तो बाळापूर रोड अकोला येथील रहिवासी आहे.
तसेच काल (दि.२१) रात्री १५ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यातील पाच जणांना घरी तर दहा जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवले आहे.
आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात तीन महिला व पाच पुरुष आहेत. यात दोघा मयत रुग्णांचाही समावेश आहे. उर्वरित रुग्णांपैकी दोघे फिरदौस कॉलनी तर अन्य हिरपूर ता. मुर्तिजापुर, भेंडगाव ता. बार्शिटाकळी, आंबेडकरनगर, गोकुळ कॉलनी येथील रहिवासी आहेत.
पैकी भेंडगाव येथील महिला रुग्ण ही मुंबईहून आलेली असून ती वर्धा येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आली होती. आल्यापासून ही महिला गावातील जि.प. शाळेतील अलगीकरण कक्षातच होती.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३४९
मयत-२३(२२+१),डिस्चार्ज-२०६
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२०
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)