तेल्हारा(प्रतिनिधी)- संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाने आहाकार माजवला आहे .अश्यातच अकोला जिल्हातील कोरोना पॉझिटिव्ह positive ची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे . आता कोरोनाने गाव वस्तीतही शिरकाव केला आहे .त्यामुळे युद्धपातळीवर विविध उपाययोजनांची आखणी स्थानिक पातळीवर आवशयक आहे .याकरिता तेल्हारा तालुका व शहरात स्थानिक प्रशासनाकडून या उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावनी होत नसल्याबाबतचे निवेदन आज नागरिकांकडून तेल्हारा तहसीलदार व नगर पालिका मुख्याधिकारी यांना देऊन अंमलबजावणी विनाविलंब करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तेल्हारा शहरात बाहेरगावतील प्रवासी नागरिकांची येजा मोठ्या संख्येने वाढतच आहे बाहेर गावातील मजुर सुध्दा मोठया प्रमाणात येत आहे .हल्ली तेल्हारा शहरात मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद तसेच परप्रांतीय मजूर घरी परतले आहे.अश्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम कॉरर्टाईन करणे गरजेचे असून
स्थानिक प्रशासनाने त्यांची नोंद घेणे आवश्यक आहे तरीही मोठ्या संख्येने बाहेर जिल्हातील नागरिक शहरात येत असून त्याची कुठल्याही प्रकारची नोंद केलेली नाही ही बाब समोर येत आहे .स्थानिक प्रशासन प्रतिबंधनात्मक उपाय योजना राबण्यास कुचकामी ठरत आहे. बाहेर गावावरुन आलेल्या कोरोना पोसिटीव्ह संशयित व्यक्तीला गावा बाहेर कॉर्रान्टीन करण्यात यावे त्याच याबरोबर तेल्हारा शहरात मोठ्या संख्येने तालुक्यातील खेड्यातील लोक मोठ्या संख्येने शहरात येत आहे त्यांच्या वर सुद्धा निर्बध लावणे आवश्यक असून लोकांची विनावश्यक येणे जाणे प्रवेशबंद करण्यात यावा असे या निवेदनात नमूद केले आहे . तेल्हारा शहरातील सीमाबंदी करून अनावश्यक लोकांची गर्दी थांबवण्यासाठी शहराच्या सीमांवर स्थानिक प्रशासनाने नोंदणी पॉईंट उभारणे गरजेचं आहे त्याच बरोबर मागील 1 महिन्यापासून जीवनावश्यक वस्तू सेवा देनारे दुकानदार , बँक कर्मचारी , याचे किमान आठवड्यातून एक वेळ आरोग्य तपासणी स्थानिक प्रशासनाने करावी. त्याच बरोबर शहरात सॅनिटायजर फवारणी करावी .अश्या विविध मागण्यासह नागरिकांनी तहसीलदार व मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांना निवेदन सादर केले आहे निवेदनावर पप्पूसेठ सोनटक्के ,रामभाऊ फाटकर , विक्की मल्ल , गजानन गायकवाड , प्रवीण वैष्णव , अनंत सोनमाळे, मंगेश घोंगे, संदीप देशमुख, सचिन थाटे , निलेश जवकार इत्यादी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत .