अकोला,दि.२० – आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे २४७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २१८ अहवाल निगेटीव्ह तर २९अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. काल (दि.१९) आणखी २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या ३०८ झाली आहे. तर आजअखेर प्रत्यक्षात १२१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण ३१४७ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ३००१ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २६९३ अहवाल निगेटीव्ह तर ३०८ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व १४६ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण ३१४७ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २९०३, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३५ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३००१ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २७५७ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३५ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २६९३ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ३०८ आहेत. तर आजअखेर १४६ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज २९ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात प्राप्त झालेल्या २४७अहवालात २१८ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर २९ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात सकाळी प्राप्त २० अहवालातील रुग्णांपैकी आठ महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील तीन गीतानगर, दोन ताजनापेठ, दोन आश्रयनगर डाबकीरोड, तर रणपिसेनगर, गुलजारपुरा, न्यू खेताननगर कौलखेड रोड, आलसी प्लॉट, कच्ची खोली सिंधी कॅम्प, खोलेश्वर, महात्मा गांधी मिल रोड सेंट्रल वेअर हाऊसिंग जवळ, भीमचौक अकोट फैल, तेलीपुरा चौक इमानदार प्लॉट, अकोट फैल, माळीपुरा, पंचशिलनगर वाशिम बायपास रोड, नानकनगर निमवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
तर आज सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या नऊ रुग्णांपैकी पाच महिला व चार पुरुष आहेत. त्यातील दोन जण न्यु तारफैल, दोन जण समता नगर तर उर्वरित प्रत्येकी खैर मोहम्मद प्लॉट, लक्ष्मी नगर, देशमुख फैल, अडगाव (खु.) ता. अकोट, पुरपिडीत क्वार्टर्स अकोट फैल येथील रहिवासी आहेत,असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी कळविले आहे.
दरम्यान, अडगाव (खु.) ता. अकोट येथील महिला हिची रविवार दि.१७ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात प्रसुती झाली आहे. ती प्रसुतीसाठी तिचे माहेर असलेल्या भिम चौक, अकोट फैल येथे आली होती, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आदल्या रात्री २३ डिस्चार्ज
दरम्यान काल (दि.१९) रात्री आणखी २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या सर्व जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे रहिवासाचे ठिकाणे याप्रमाणे- माळीपुरा-४, खैर मोहम्मद प्लॉट ४, आंबेडकर नगर-६, गवळीपुरा-२, तारफैल-२, भिम चौकअकोट फैल-२, पंचशीलनगर-१, ओल्ड आळशी प्लॉट-१, अकोट फैल-१ याप्रमाणे आहे. आता एकूण डिस्चार्ज दिलेल्या व्यक्तिंची संख्या १६७ झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिली आहे.
१२१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ३०८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २० जण (एक आत्महत्या व १९ कोरोनामुळे) मयत आहेत. काल मंगळवार दि.१९ रोजी २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १६७ झाली आहे. तर सद्यस्थितीत १२१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर २९३५ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १७०३ गृहअलगीकरणात तर ९९ जण संस्थागत अलगीकरणात असे १८०२ जण अलगीकरणात आहेत. तर १००७ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १२६ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.