• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

२३२ अहवाल प्राप्तः १८ पॉझिटीव्ह, २३ डिस्चार्ज, दोन मयत

Team by Team
May 19, 2020
in अकोला, Corona Featured, Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
akola corona positive update report (6)
26
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१९ – आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे २३२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २१४ अहवाल निगेटीव्ह तर १८ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आधीच मयत झालेल्या एकाचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला तर आधीपासून उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. असे दोघे जण आज मयत झाले. तर काल (दि.१८) आणखी २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या २७९ झाली आहे. तर आजअखेर प्रत्यक्षात ११५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २८२६ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २७५४ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २४७५ अहवाल निगेटीव्ह तर २७९ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ७२ अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आजपर्यंत एकूण २८२६ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २५८३, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३४ नमुने होते. आजपर्यंत एकूण २७५४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २५११ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३४ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २४७५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २७९ आहेत. तर आजअखेर ७२ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज १८ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात प्राप्त झालेल्या २३२अहवालात २१४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १८ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज प्राप्त झालेल्या पॉझिटीव्ह अहवालांपैकी ११ पुरुष आणि सात महिला आहेत. तर त्यातील चार जण हे भीम चौक अकोट फैल येथील तर अन्य सोनटक्के प्लॉट जुने शहर, सिंधी कॅम्प, मुजप्फरनगर लकडगंज, आंबेडकरनगर बसस्टॅंड मागे, फिरदौस कॉलनी, दगडी पूल, बैदपूरा, आदर्श कॉलनी सिंधी कॅम्प, अकोली बुद्रुक गीतानगर जुनेशहर, हाजीनगर अकोट फैल, व्हीएचबी कॉलनी रतनलाल प्लॉट,मोमीनपुरा ताजनापेठ, रंगारहट्टी बाळापुर येथील रहिवासी आहेत. तर चिराणीया कंपाऊंड, रामदास पेठ येथील व्यक्ती काल (दि.१८) मयत झाला होता.त्याचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला,असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी कळविले आहे.

दोघांचा मृत्यू

आज सायंकाळी प्राप्त अहवालात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. ही व्यक्ती चिराणीया कंपाऊंड रामदास पेठ येथील ६८ वर्षीय व्यक्ती आहे. ही व्यक्ती दि.१६ रोजी दाखल झाली होती तर काल (सोमवार दि.१८ ) मृत्यू झाला. त्यांचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला. तर आज उपचार घेतांना आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण ६२ वर्षीय व्यक्ती असून सावंतवाडी रणपिसेनगर येथील रहिवासी आहे. हा व्यक्ती दि.१५ रोजी दाखल झाला होता. त्यांचा अहवाल दि.१७ रोजी पॉझिटीव्ह आला होता. उपचार सुरु असतांना आज ही व्यक्ती मयत झाली.

आदल्या रात्री २३ डिस्चार्ज

दरम्यान काल (दि.१८) रात्री आणखी २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या सर्व जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. यातील आठ जण खैर मोहम्म्द प्लॉट येथील तर तीन जण आंबेडकर नगर, तीन जण रामनगर सिव्हील लाईन्स येथील तर उर्वरीत ओल्ड आळशी प्लॉट, माळीपुरा, फिरदौस कॉलनी, गोकुळ कॉलनी, तारफैल, भीमनगर, सराफा बाजार, जुनी शहर पोलीस चौकी, अकोट फैल या भागातील रहिवासी आहेत. आता एकूण डिस्चार्ज दिलेल्या व्यक्तिंची संख्या १४४ झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिली आहे.

११५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत २७९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २० जण (एक आत्महत्या व १९ कोरोनामुळे) मयत आहेत. काल सोमवार दि.१८ रोजी २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १४४ झाली आहे. तर सद्यस्थितीत ११५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान आजअखेर २७७३ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १६०९ गृहअलगीकरणात तर ७५ जण संस्थागत अलगीकरणात असे १६८४ जण अलगीकरणात आहेत. तर ९५६ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १३३ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

अधिक वाचा: अकोल्यात सायंकाळच्या अहवालात एक पॉझिटिव्ह तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यु, एकूण आकडा २७९

Tags: CoronaVirusअकोलाकोविड १९
Previous Post

कोरोना काळात गेल्या पन्नास दिवसांपासून तो करीत आहे अकोला पोलिसांची गुप्त सेवा,कोण आहे तो वाचा सविस्तर…

Next Post

ग्रामीण भागात मजुरांना काम द्या, अन्यथा काय करायचे ते सांगतो –  प्रकाश आंबेडकर

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
prakash ambedkar

ग्रामीण भागात मजुरांना काम द्या, अन्यथा काय करायचे ते सांगतो -  प्रकाश आंबेडकर

Uday Samant

अंतिम वर्षाच्या अंतिम परीक्षा घेणं आम्हाला शक्य नाही- उदय सामंत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.