हिवरखेड नजीकच असलेल्या चितलवाडी शेत शिवारात नागोराव पाथ्रीकर यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत 15 मे शुक्रवारी रात्रीच्या अंधारात बिबट पडलेला आहे. शनिवारी सकाळी ही बाब गावकर यांच्या निदर्शनास आले. सदर माहिती चितलवाडी चे उपसरपंच शिवाजी मेतकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. सरपंच गजानन नांदुरकर पोलीस पाटील उत्तम देवळे यांनी वनविभागाला माहिती दिल्यावर आकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक श्रीमती टी बेऊला, सहाय्यक वनसंरक्षक आवारे, वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण प्रवीण पाटील कांबळे इत्यादींसह वन विभागाचे पथक बिबट्याचे रेस्क्यु करण्यासाठी सकाळीच घटनास्थळी पोहोचले होते. परंतु तासनतास प्रयत्न करूनही आणि बिबट्याला खाद्य दिल्यावरही त्याचे रेस्क्यू शक्य न झाल्यामुळे शेवटी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील वन्यजीव विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. अकोट आणि परतवाडा येथील वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले परंतु शनिवारी 16 मे रोजी रात्री उशिरापर्यंत ही बिबट्याला रेस्क्यू करण्यात यश मिळाले नाही.
रविवारी सकाळी पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू होणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सदर बिबट्याचे रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले