नवी दिल्ली – कोरोनाची महामारी आणि टाळेबंदी या दोन्ही कारणामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडिया इकॉनॉमी या संस्थेने बेरोजगारीची धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. मार्चमध्ये बेरोजगारीचे प्रमाण २३.८ टक्क्यांवरून २४.६ टक्के झाले आहे.टाळेबंदीदरम्यान कृषीची कामेही स्थगित करण्यात आली होती. त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील बेरोजगारी वाढून १३.०८ टक्के झाली आहे. तर शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण वाढून १४.५३ टक्के झाले आहे. सीआयएमईच्या अहवालानुसार रोजगाराचे प्रमाण ३९६ दशलक्षवरून ४११ दशलक्ष झाले आहे. तर बेरोजगार लोकांचे प्रमाण हे ३२ दशलक्षवरून ३८ दशलक्ष झाले आहे. टाळेबंदीचा सर्वाधिक फटका नागरी विमान वाहतूक, प्रवास, आदरातिथ्य, किरकोळ विक्री, उत्पादन आणि स्वयंचलित क्षेत्राला बसला आहे.
हेही वाचा : राज्यातील ५ हजार ४३४ ग्राहकांना मिळाले घरपोच मद्य
प्रवास आणि आदरातिथ्य क्षेत्र
या क्षेत्राचे रोजगारात १२.७५ टक्के योगदान आहे. तर त्यामधून प्रत्य ५.७६ टक्के लोकांना तर अप्रत्यक्षपणे ७.१९ टक्के लोकांना रोजगार मिळत आहे. पर्यटन क्षेत्रामधून २०१८-१९ मध्ये ८७ दशलक्ष लोकांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. ही माहिती पर्यटन मंत्रालयाने वार्षिक २०१९-२० च्या अहवालात दिली आहे. भारतीय पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगातून सुमारे ३८ दशलक्षहून अधिक नोकऱ्या गमाविण्याची भीती आहे. तर या उद्योगातील सुमारे ७० टक्के मनुष्यबळ आहे. ही आकडेवारी केपीएमजी फायनान्शियल सर्व्हिसे आणि अॅडव्हायझरी कंपनीने १ एप्रिलला दिली आहे. प्रवास आणि पर्यटन उद्योगातील नऊ दशलक्ष म्हणजे गोव्याच्या लोकसंख्येच्या सहापट लोकसंख्या ही नोकऱ्या गमाविण्याची भीती आहे. ही आकडेवारी जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषदेने दिली आहे.
विमान वाहतूक क्षेत्र-
सीएपीए इंडिया ही प्रवास आणि पर्यटन सल्लागार क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. या कंपनीने विमान वाहतूक क्षेत्रातील चलनवलन हे ६६ टक्क्यांहून अधिक थंडावल्याचे एप्रिलमधील अहवालात म्हटले आहे. जागतिक विमान वाहतूक उद्योगाची संघटना आयएटीएने भारतामधील विमान वाहतूक क्षेत्राचे २० लाखहून अधिक नोकऱ्या धोक्यात असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : त्यामुळे राज्यातील विजेचे दर वाढण्याची शक्यता : ऊर्जामंत्री नितीन राऊत
वाहन उद्योग क्षेत्र
टाळेबंदीमुळे वाहन उद्योगाला अचानकपणे उत्पादन थांबवावे लागले आहे. त्यामुळे वाहन विक्री आणि उत्पादनात कमालीची घसरण झाली आहे. वाहन कंपन्यांचे बहुतेक उत्पादन प्रकल्प बंद आहेत. मोठ्या वाहन कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतनकपात करणार असल्याचे जाहीर केले आहे. डीलरशिप देण्याच्या निर्णयावरही कंपन्या प्रतिक्षा करत आहेत. स्थावर मालमत्ता क्षेत्रावर टाळेबंदीचा मोठा परिणाम झाला आहे. अॅनारॉक ग्रुपने गृहखरेदीच्या प्रमाणात २५ ते ३५ टक्के घसरण झाल्याचे म्हटले आहे. तर कार्यालये घेण्याचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत १३ ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. टाळेबंदीनेतर मनुष्यबळ स्थावर मालमत्ता क्षेत्रात परत येण्यासाठी काही आठवडे लागणार आहेत. रखडलेले गृहप्रकल्प पूर्ण करण्यासाठी घाई होणार असल्याचे अॅनारॉकने म्हटले आहे.
एमएसएमई क्षेत्र
सरकारकडून मदत मिळत असली तर एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांचे नुकसानीवरील नियंत्रण संपूर्ण सुटले आहे. त्यांना महसूल मिळविता येत नसल्याने तग धरून राहण्यासाठी संघर्ष सुरू आहे. जर सरकारकडून कोणतेही आर्थिक पॅकेज जाहीर झाले नाही तर वस्त्रोद्योग साखळीतील १० दशलक्ष नोकऱ्या धोक्यात आहेत.
हेही वाचा : लघु उद्योगांसाठी मोठ्या घोषणा व निर्णय
निर्यात क्षेत्र
ऑर्डर रद्द होणार असल्याने तयार कपड्यांच्या क्षेत्रातील सुमारे २.५ ते ३ दशलक्ष नोकऱ्या जाण्याची भीती आहे. कोरोनाच्या संकटामुळे जागतिक व्यापार थंडावला आहे. अशा संकटात निर्यात क्षेत्रातील १.५ कोटी लोकांहून अधिक जणांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. असा अंदाज फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनने वर्तविला आहे.हेही वाचा-जागतिक बँकेचा भारताला मदतीचा हात; एवढे देणार अर्थसहाय्य
माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (आयटी उद्योग)
येत्या काही महिन्यात भारतामधील विविध आयटी कंपन्यांमधील १.५ लाखांहून अधिक जणांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे.
असंघटित क्षेत्र
दोन आठवड्याच्या टाळेबंदीत देशात १९९ दशलक्षहून अधिक कामगारांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत. तर शहरी भागात असंघटित अशा पाच क्षेत्रात ९३ दशलक्ष कामगार आहेत. त्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम झाला आहे. ही आकडेवारी कामगार मनुष्यबळ सर्वेक्षण २०१७-१८ मध्ये दिलेली आहे. यामध्ये उत्पादन क्षेत्र (28 दशलक्ष), व्यापार, हॉटेल आणि रेस्टॉरंट (३२ दशलक्ष), बांधकाम (१५ दशलक्ष), वाहतूक, साठवणूक आणि संवाद (११ दशलक्ष) आणि वित्त, व्यवसाय आणि स्थावर मालमत्ता क्षेत्र (७ दशलक्ष)तांत्रिक विश्लेषणानुसार असंघटित क्षेत्रातील सुमारे ४० दशलक्षहून अधिक कामगारांवर वाईट परिणाम झाला आहे. लहान दुकानदार आणि विक्रेते (१३ दशलक्ष), बांधकामातील मजूर ( ७ दशलक्ष), उत्पादन (३ दशलक्ष), वाहतूक (२ दशलक्ष), घरगुती मदत ( ४ दशलक्ष), घर स्वच्छता आणि रेस्टॉरंट स्वच्छता कामगार (३ दशलक्ष), पेंटर आणि बिल्डिंग स्ट्रक्चर क्लिनअर्स (३ दशलक्ष), स्टॉल आणि बाजारातील विक्रेते (२ दशलक्ष), रस्त्यावरील विक्रेते (२ दशलक्ष), कचरावेचक (१ दशलक्ष) असे मनुष्यबळ कार्यरत आहे. देशात सुमारे १२० दशलक्ष स्थलांतरित मजूर आहेत. हे मोलमजुरीने काम करतात. त्यांच्या उदरनिर्वाहावर टाळेबंदीने परिणाम झाला आहे.
हेही वाचा-रेल्वे प्रवास नाहीच! 30 जून पर्यंतचे सर्व प्रवासी तिकीट बुकिंग रद्द
नोकरभरतीत अशी झाली आहे घट
नोकरभरतीत अशी झाली आहे घट
प्रवास आणि आदरातिथ्य – ५६ टक्के
किरकोळ विक्री क्षेत्र – ५० टक्के
वाहन उद्योग – ३८ टक्के
औषधी – २६ टक्के
विमा – ११ टक्के
सॉफ्टवेअर – ११ टक्के
बँकिंग आणि वित्तीय सेवा – ९ टक्के
झी एन्टरेमेंटच्या महसुलात जानेवारी ते मार्चदरम्यान २८ टक्के घसरण झाली आहे. तर सन टीव्हीच्या महसुलात २० टक्के घसरण झाली आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीसने मार्चमध्ये नोकरभरतीत ९ टक्क्यांनी कपात केली आहे. तर ओयो हॉटेल्स आणि होम्सने मनुष्यबळात १६ टक्के ( ४ हजार कर्मचारी) कपात केली आहे.
ओलाने मनुष्यबळात ८ टक्के, क्विकरने (Quikr) ९०० कर्मचारी कमी केले आहेत. रिटेल्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (आरएआय) आकडेवारीनुसार किरकोळ क्षेत्रातील ४० टक्के कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत.
रोजगाराची संख्या
ई कॉमर्स – १४.५ लाख
अन्नप्रक्रिया उद्योग – ६९.९ लाख
किरकोळ विक्री क्षेत्र- ४७४ लाख
पर्यटन – ५०० लाख
बांधकाम उद्योग – ६६२ लाख