• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

१६१ अहवाल प्राप्तः ११ पॉझिटीव्ह, दोन महिला मयत

Team by Team
May 15, 2020
in अकोला, Corona Featured, Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
akola-corona-update-3-april-2020
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१५ – आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १६१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १५० अहवाल निगेटीव्ह तर ११ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या २१८ झाली आहे. दरम्यान काल रात्री उशीरा २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच उपचारादरम्यान दोन महिला मयत झाल्या आहेत. त्यामुळे आजअखेर प्रत्यक्षात १०१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २३६३ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २१४५ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण १९२७ अहवाल निगेटीव्ह तर २१८ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व २१८ अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

आजपर्यंत एकूण २३६३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २१५२, फेरतपासणीचे १०८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०३ नमुने होते. आजपर्यंत एकूण २१४५ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १९३४ तर फेरतपासणीचे १०८ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०३ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १९२७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २१८ आहेत. तर आजअखेर २१८ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज ११ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात प्राप्त झालेल्या १६१ अहवालात १५० अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ११ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेला एक रुग्ण हा निसर्ग सोसायटी खडकी येथील रहिवासी असून ३५ वर्षीय पुरुष आहे. तर सायंकाळी पॉझिटीव्ह आढळलेल्या १० पॉझिटीव्ह रुग्णात पाच जण महिला व पाच पुरुष आहेत. त्यातील चार जण आंबेडकर नगर न्यू बसस्टॅण्ड मागे येथील तर दोन फिरदौस कॉलनी, दोन भिम चौक अकोट फैल येथील तर गवळीपुरा व पंचशिल नगर वाशीम बायपास येथिल प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.
दरम्यान आज पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झालेली फिरदौस नगर मधील महिला ही काल (दि.१४) मयत झाली होती. ही महिला दि. १२ रोजी दाखल झाली होती. तर आज सकाळी आणखी एक महिला मयत झाली. ही ६५ वर्षीय महिला मोमीनपुरा येथील रहिवासी असून ती दि. ११ रोजी दाखल झाली होती.

२८ जणांना डिस्चार्ज पैकी २४ निरीक्षणात

काल रात्री व आज सकाळी उपचार पूर्ण झालेल्या २८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यातील चौघे जणांना घरी सोडण्यात आले. ते आता घरातच पण क्वारंटाईन राहतील तर अन्य २४ जणांना पीकेव्ही मधील कोवीड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे.

१०१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत २१८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १७ जण (एक आत्महत्या व १६ कोरोनामुळे) मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना, बुधवार दि.६ मे रोजी एकास , मंगळवार दि.१२ मे रोजी ६० जणांना तर गुरुवार दि.१४ रोजी आधी १२ व नंतर रात्री उशीरा २८ असे ४० जणांना म्हणजेच एकूण १०० जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १०१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: अकोलाकोरोनाकोविड १९
Previous Post

कुणीही पायी जाणार नाही याची खबरदारी घ्या- विभागीय आयुक्त पियुष सिंह यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

Next Post

परदेशी शिष्यवृत्तीसाठी सहा लाखांची क्रिमीलेयर मर्यादा हा सामाजिक अन्याय – राजेंद्र पातोडे.

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
rajendra patode

परदेशी शिष्यवृत्तीसाठी सहा लाखांची क्रिमीलेयर मर्यादा हा सामाजिक अन्याय - राजेंद्र पातोडे.

त्यामुळे राज्यातील विजेचे दर वाढण्याची शक्यता : ऊर्जामंत्री नितीन राऊत

आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत ३० मेनंतर अंतिम निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.