• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कुणीही पायी जाणार नाही याची खबरदारी घ्या- विभागीय आयुक्त पियुष सिंह यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

Team by Team
May 15, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 0
0
Collector Office
12
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१५ – स्थलांतरीत मजूरांची त्यांच्या राज्यात परतण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहेच. तथापि ज्यांना आपापल्या राज्यात जायचे आहे त्यांच्यापैकी कुणी पायी जाणार नाही याची खबरदारी घ्या, पायी जाणारे मजुर दिसले तर त्यांना थांबवून त्यांच्या पुढच्या प्रवासाची सोय करा, असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी जिल्हाप्रशासनाला दिले.

विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषद सीईओ डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, डॉ. अपुर्व पावडे, उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन सदाशिव शेलार, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे, सीसीआयचे अजयकुमार आदी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यावेळी आयुक्तांनी जिल्ह्यातील व शहरातील प्रतिबंधात्मक क्षेत्रांची माहिती घेऊन त्यातील जेथे २८ दिवसांपेक्षा अधिक कालावधीत कोणीही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नसल्यास त्या क्षेत्रास प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून वगळा अशी सुचना केली. ज्या भागात संसर्गाचे प्रमाण जास्त आहे तेथे संपर्क तपासणी करुन आरोग्य तपासण्या करा. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व चाचणी सुविधांबाबत त्यांनी माहिती घेतली.

कापूस खरेदीचा वेग वाढवा

जिल्ह्यात सुरु असलेल्या सीसीआय मार्फत कापूस खरेदी संदर्भात ग्रेडरची संख़्या वाढवून जिल्ह्यातील कापूस खरेदीची प्रक्रिया पुर्ण करा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात सीसीआय २९ हजार ४६५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत २३४९ शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी झाला आहे. तेव्हा ग्रेडरचे मनुष्यबळ वाढवून उर्वरित काम दुप्पट वेगाने पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

स्थलांतरीत मजुरांच्या प्रवासाचा आढावा

जिल्ह्यातून परराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या परप्रांतीय स्थलांतरीत मजूरांच्या प्रवास व्यवस्थेबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी माहिती देण्यात आली की, अकोला जिल्ह्यातून राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या मजुरांची संख़्या ३७९ आहे. परप्रांतीय मजुर ४८३१ होते त्यापैकी आतापर्यंत २२११ जणांना रवाना करण्यात आले असून २६२० जणांच्या जाण्याचे नियोजन सुरु आहे. तर अकोला जिल्ह्यातील लोक जे परप्रांतात अडकले आहेत त्यांची संख़्या१३७१ असून या सर्व जणांना जिल्हा प्रशासनाने त्यांनी मागणी केल्यानुसार ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले आहेत. यावेळी आयुक्तांनी सांगितले की, जिल्ह्यातून कुणीही मजुरांचे गट पायी जात असतील तर त्यांना थांबवून त्यांची ज्या प्रमाणे विभागस्तरावरुन रेल्वे वा त्यांच्या राज्याच्या सिमेपर्यंत बस सेवेद्वारे जाण्याची व्यवस्था करावी.

होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप

येथील रेडक्रॉस सोसायटीमार्फत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य संलग्न कार्यालये येथे मोफत वाटप करण्यात आले. त्यासाठीचे औषधे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांचेकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी रेडक्रॉसचे अध्यक्ष प्रभतसिंग बच्छेर, डॉ, मालोकार व होमिओपॅथी डॉक्टर संदीप चव्हाण आदी उपस्थित होते.

Tags: अकोलाअपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकरमनपा आयुक्त संजय कापडणीसविभागीय आयुक्त पियुष सिंह
Previous Post

आधारभूत किंमत धान्य खरेदीः जिल्ह्यात सात केंद्रांना मान्यता

Next Post

१६१ अहवाल प्राप्तः ११ पॉझिटीव्ह, दोन महिला मयत

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
akola-corona-update-3-april-2020

१६१ अहवाल प्राप्तः ११ पॉझिटीव्ह, दोन महिला मयत

rajendra patode

परदेशी शिष्यवृत्तीसाठी सहा लाखांची क्रिमीलेयर मर्यादा हा सामाजिक अन्याय - राजेंद्र पातोडे.

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.