अकोला(प्रतिनिधी)-कोविड १९ संसर्गजन्य महामारी आजारामुळे सर्वत्र उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत आर्थीक सहकार्या बाबत डाॅ.श्री प्रविण लोखंडे साहेब. जिल्हा उपनिबंधक सह. संस्था, अकोला यांनी आमच्या संस्थेला केलेल्या आवाहनानुसार खारीचा वाटा म्हणुन अकोला / वाशिम जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पत संस्थे कडून मा.मुख्यमंत्री सहायता निधीस रूपये ११०००/ – निधी देण्यात आला त्या प्रसंगी सदर रकमेचा धनादेश मा.डाॅ.श्री लोखंडे साहेब जिल्हा उपनिबंधक यांचेकडे धनादेश सुपूर्द करतांना पतसंस्थेचे अध्यक्ष मा. श्री पी.पी.देशमुख, बापु यांचे हस्ते देण्यात आला.त्या प्रसंगी मा. सचिव श्री अलकरी; कोषाध्यक्ष. श्री प्रमोद जाधव व मा. संचालक श्री भांडारकर , मा. संचालिका श्रीमती सुर्वे व सभासद श्री दिनेश ठाकुर, श्री ज्ञानेश्वर चिंचोळकर व संस्थेचे कर्मचारी ऊपस्थीत होते .