रीधोरा (प्रतिनिधी)- कोरोना रोगराई ने सम्पूर्ण जगामध्ये थैमान घातलेलं असताना भरतामध्ये सुद्धा त्याचे परिणाम दिसून येत आहेत त्यात 21 एप्रिल पासून भारतासह महाराष्ट्रात सुद्धा लॉकडाऊन ची घोषणा झाली होती लॉकडाऊन असताना गरीब मजूर व मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असलेल्या मजुरांवर उपास मारीची वेळ येऊ नये म्हणून रीधोरा येथील समाज कार्यात सदा अग्रसेर असलेले रणजित तायडे यांनी पुढाकार घेऊन रीधोरा येथील मोल मजुरी करून आपले पोट भरणाऱ्या लोकांना गरीब तसेच गरजू व अपंग बांधवाना अन्यधाण्याचे वाटप केले आहे. अन्नधान्याचा वाटण्यात आलेल्या किटमध्ये 10 किलो गहू , 10 तांदूळ, 5 तेल, 5 साखर कांदे , आलू मदतीचा हात म्हणून उपक्रम राबविला या उपक्रमामध्ये रोज दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूचे वितरण रणजित तायडे मित्र परिवारातर्फे रिधोरा गावामध्ये आवश्यक वस्तूंचे वितरण केले.