अकोला, दि.१३: माथाडी कामगार कायद्याअंतर्गत अनुसुचित उद्योगातील एकुण १२५४ कामगांराना एक कोटी चार लक्ष ७६ हजार ७९४ रुपये एवढी रक्कम सानुग्रह अनुदान, वैद्यकीय लाभ व भरपगारी रजेचा लाभ म्हणून अदा करण्यात आली, अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त रा. दे. गुल्हाणे यांनी दिली आहे.
यासंदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम,१९६९ अंतर्गत माथाडी मंडळाचे कार्यक्षेत्रातील अनुसूचित उद्योगात कार्यरत माथाडी कामगारांना सानुग्रह अनुदान, वैद्यकीय लाभ व भरपगारी रजा इत्यादीचा लाभ दरवर्षी वाटप करण्यात येतो. सद्य:स्थितीत कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव झाल्यामुळे लॉकडाउन मुळे काम बंद असल्याने दैनंदीन गरजा पूर्ण करता याव्यात याकरीता आर्थिक मदत व्हावी या करीता १ मे कामगार दिनाच्या पार्श्वभुमीवर या रकमेचे वाटप करण्यात आले. माथाडी मंडळातील नोंदीत कृषी उत्पन्न बाजार समिती, रेल्वे मालधक्का, शासकीय धान्य गोदाम, कारखाना, किराणा बाजार, आलु कांदा मार्केट, वाहतुक इत्यादी अनुसुचित उद्योगात कार्यरत हमाल कामगारांची गर्दी जमा होवुन कोरोना १९ विषाणुचा धोका टाळण्यासाठी नोंदीत, जिवीत (सक्रीय) कामगारांच्या थेट बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आलेली आहे. अनुसुचित उद्योगातील एकुण १२५४ कामगांराना एक कोटी चार लक्ष ७६ हजार ७९४ रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे. या करीता मंडळातील सर्व कर्मचारी यांनी लॉक डावुन असतांना सुध्दा कोरोनामुळे निर्माण झालेल्या परीस्थितीमध्ये स्वतःच्या जिवाला धोका असतांना सुद्धा परिश्रमपुर्वक सर्व मार्च एंन्डींग ची कामे पुर्ण करुन सानुग्रह अनुदान वैद्यकीय लाभ इ. चे हिशेब वेळेत पुर्ण केल्याने माथाडी कामगारांच्या संघटना व माथाडी कामगारांनी अडचणीच्या वेळी मंडळाने मदत केल्याने मंडळाचे सर्व कर्मचारी तसेच अधिकारी यांचे आभार मानले आहेत, असे सहायक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, अकोला वाशीम बुलडाणा जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ,अकोला रा.दे.गुल्हाने यांनी कळविले आहे.